Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे स्थानकात प्रवासी मृत्यूंचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. अपुऱ्या लोकल फेऱ्या, प्रचंड गर्दी आणि रखडलेले प्रकल्प यामुळे प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 02:04 PM
ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२२ ते २०२५ दरम्यान सर्वाधिक मृत्यूंची नोंद ठाणे रेल्वे स्थानकात आढळून आली आहे.
  • कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका आणि नवे ठाणे स्थानक प्रकल्प वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत.
  • पुनर्विकास प्रकल्पाबाबतही अनिश्चितता आढळून आली आहे ज्याचा रेल्वे अपघातांवर परिणाम होतो.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे स्थानक हे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक मानले जाते. मात्र गेल्या चार वर्षांत उपनगरी रेल्वेमधील मृत्यूंची सर्वाधिक प्रकरणे याच स्टेशनवरून नोंदविण्यात आली आहेत. अपुऱ्या लोकल फेऱ्या, गाड्यांचा वारंवार होणारा विलंब, प्रवाशांना दरवाज्यात लटकून करावा लागणारा प्रवास आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेले पायाभूत प्रकल्प या सगळ्यांचा परिणाम प्रवाशांच्या सुरक्षिततेवर होत आहे. सीएसएमटी ते कल्याण, कसारा आणि कर्जत या मार्गावरील लोकल गाड्या नियमित उशिरा धावत असल्याने गर्दी आणखी वाढते. त्यातच एसी लोकलच्या अयोग्य नियोजनामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी?

आपली ट्रेन चुकू नये म्हणून अनेक प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात, तर काही जण भरगच्च गाड्यांमध्ये दरवाज्याला लटकून प्रवास करतात. ठाणे स्थानक परिसरात घडणाऱ्या अपघातांपैकी बहुतेक घटना रुळ ओलांडताना किंवा धावत्या गाडीतून पडल्यामुळे घडल्या आहेत. २०२५ मध्ये रुळ ओलांडताना १२५ पुरुष आणि १९ महिलांचा मृत्यू झाला, तर धावत्या लोकलमधून पडून ६० पुरुष आणि ६ महिलांनी जीव गमावला. २०२२ ते २०२५ या काळात मृत्यूंचे प्रमाण वाढत असतानाही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडल्याची टीका होत आहे.

कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका प्रकल्प

ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी २०१६ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पामुळे कल्याणहून थेट ऐरोलीपर्यंत लोकल सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित वेळ अद्याप जाहीर झालेली नाही. परिणामी, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांना ठाणे स्थानकावरच अवलंबून राहावे लागते.

रेल्वे पोलिसांची भूमिका

स्थानक परिसरातील अनधिकृत चोरवाटा बंद करणे, रुळ ओलांडण्यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकल वेळेत धावण्याबाबत रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दल व मध्य रेल्वेला पत्रे पाठवली आहेत. तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही.

नवे ठाणे स्थानक

२०१७ मध्ये ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाची घोषणा करण्यात आली होती. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र अनेक वर्षे उलटूनही ते सुरू झालेले नाही, त्यामुळे विद्यमान ठाणे स्थानकावरील गर्दी कायम आहे.

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

स्थानक पुनर्विकास योजना

आरएलडीए आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्थानकाचे मल्टी-मोडल ट्रान्झिट हबमध्ये रूपांतर करण्याची योजना आहे. या प्रकल्पात व्यापारी संकुल आणि हेलिपॅडचाही समावेश आहे. मात्र या पुनर्विकासाचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Thane railway station turned into a death trap highest number of train accidents recorded in four years shocking report revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Accident Case
  • Railway Accident
  • thane

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
1

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
2

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
3

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल
4

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.