खेड (रत्नागिरी) : आजचं आलेलं हे भगवं वादळ आहे हे प्रसारमाध्यमांनी सर्वांना दाखवा. कोकण (Kokan) ही लोकमान्य टिळकांची (Lokmanya Tilak) जन्मभूमी आहे. याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. तीच तीच आदळआपट, तिला काय उत्तर देणार? मुंबईतही गेले सहा महिने अशीच आदळआपट सुरू आहे. नुसता एकच शब्द आहे. गद्दार! आज आलो तेव्हा सरगळीकडे माणसंच माणसं. हा जनसागर आहे. आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. या सभेने उत्तर दिलं आहे. कोकणी माणूस (Kokani Manus) बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांच्या पाठिशी आहे. असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी खेड (Khed, Ratnagiri) मधील गोळीबार मैदानातील सभेला संबोधित करताना काढले.
आम्ही गर्दीची तुलना करायला इथे आलेलो नाही. यांच्या आता सर्कशीसारख्या राज्भर सभा होतील. निर्णय घेतला नसता तर काय परिस्थिती आली असती? सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पक्ष गहाण ठेवला. यांच्याकडे गद्दार, खोके इतकेच शब्द. सत्तेत आल्यानंतर धनुष्यबाण, शिवसेनापक्ष सोडवण्याचं काम आम्ही केलं. बाळासाहेब म्हणायचे नाव गेलं की, परत येत नाही. आम्ही डाग पुसण्याचं काम केलं.
राहुल गांधी सातत्याने सावरकरांवर बोलत आहेत. सावकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. सावकरांचा अवमान करणाऱ्या विरोधात तुम्ही काहीच बोलत नाही. बाळासाहेब हे तुमचे (Uddhav Thackeray) वडील होते हे सांगून तुम्ही त्यांना छोटं करू नका. ते आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांच्या नावानं खोटी सहानुभूती मिळवू नका.
आम्ही देश आणि राज्याच्या हिताची भूमिका घेतली.आम्हाला संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, ऐश्वर्य आहे. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करण्याची यांची तयारी सुरू आहे.
तुम्हाला माणसं का सोडून चाललेत याचं चिंतन करा राष्ट्रवादीचा पूर्व इतिहास तपासा. मनोहर जोशींविरोधात कटकारस्थान केलं. त्यांना स्टेजवरून खाली उतरायला लावलं. रामदास कदमांबाबतही असंच करण्यात आलं. एकनाथ शिंदेवर १०९ केसेस आहेत. तुमच्यावर किती आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कार्यकर्त्याला पुढं नेणारे बाळासाहेब ठाकरे. तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघालात. शिवसेना वाढवण्याची राज ठाकरे यांची मागणी होती. जिथं शिवसेना नाही तो भाग मला द्या ही राज ठाकरे यांची मागणी होती.दरवाजे उघडे ठेवा. सर्वच जातील. तुम्ही फक्त हम दो हमारे दो एवढेच राहतील.
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईकांपासून किती लोकं शिवसेना सोडून गेले. स्वार्थ जेव्हा डोक्यात जातो तेव्हा त्याला काहीही दिसत नाही. मी फिरणारा मुख्यमंत्री, घरी बसून राहणारा नाही. अडीच वर्ष वर्षा बंगला सर्वसामान्यांसाठी बंद होता. आता वर्षा बंगला सर्वांसाठी कायम उघडा आहे. तुम्ही बोलत राहा मी काम करत राहीन.
१ लाख ३७ हजार कोटींचे दावोस मध्ये MOU साईन केले. आमचा अजेंडा एकच सर्वसामान्यांचं भलं झालं पाहिजे. तुम्ही फक्त गाजर दाखवलंत. आम्ही गाजर हलवा दिला.
कोकणातील सिंचन प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करणार. कोकणात आंबा, काजू प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणार. मंडणगडमध्ये एमआयडीसी सुरू करण्याची शिंदेची घोषणा. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करणार. मर्यादा सोडण्याची वेळ आमच्यावर आणू नका