Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी एकटा पडलोय, मला घेरण्यासाठी…’; मनोज जरांगेंचे मराठा नेत्यांना भावनिक आवाहन

सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून एकवटले आहेत. ते नेते मतांचा नाही आरक्षणाचा विचार करत आहेत आणि मराठा नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2024 | 11:34 AM
सौजन्य- सोशल मीडिया

सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

जालना : “आता मी एकटा पडलोय, मला एकटे पाडण्यासाठी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी मराठ्याच्या पोरांसाठी लढतोय, समाजासाठी लढतोय. मराठा समाजाने तरी माझ्या मागे उभे राहा, आता मराठ्यांच्या नेत्यांनी एकजूट व्हा, मराठा समाजही तुम्हाला उघडे पडू देणार नाही, मग तुम्ही कोणत्याही पक्षातील असलात तरी एक़जूट व्हा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.

राज्यात जे काही चाललेय ते छगन भुजबळ यांनी सुरू केलं आहे. आम्ही जातीवाद करत नाही, जातीवाद त्यांनी सुरू केलाय,” असा घणाघात मराठा उपोषकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे म्हणाले, “हा माणूस जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा माणूस मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या जिवावर सत्तेत येणाऱ्या ओबीसी नेत्यांचे  खरे चेहरे समोर आले, त्यांची सत्यता बाहेर आली.”

“सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून एकवटले आहेत. ते नेते मतांचा नाही आरक्षणाचा विचार करत आहेत आणि मराठा नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा त्यांच्या आणि आमच्या नेत्यांमंध्ये फरक आहे.

आरक्षण किती मोठा विषय आहे  हे लक्षात येते भाजपमधील सर्व ओबीसी नेते, अजित पवार यांच्या गटातील ओबीसी नेते, शिंदे गटातील ओबीसी नेतेही एकत्र झाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस या पक्षातीलही सर्व नेते एक झाले.  सगळे ओबीसी नेते एकवटले, मग मराठा समाजातील नेत्यांनाही हे कळत नाही का, त्यांच्यासाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे. ते पद आणि मतांपेक्षांही आरक्षणाला महत्त्व देत आहेत.

माझी मराठा समाजाला विनंती आहे. 6 जुलैपर्यंत सर्व मराठ्य़ांनी आपापली कामे उरकून घ्या, 6ते 13 जुलै दरम्यान आपण जी शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे यारॅलीला सर्व मराठ्यांनी उपस्थित राहा. डोळ्यांदेखत मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होऊन देऊ नका. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या रॅली ठेवण्यात आल्या आहेत. त्या दिवशी कोणीही घरी बसणार नाही, कोणाच्या लग्नाला जाणारनाही. सर्वांनी या रॅलीत हजर राहायचे आहे. असे आवाहन यावेळी जरांगे यांनी केले.

Web Title: I am alone manoj jaranges appeal to maratha leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
2

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
4

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.