ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज होती का? डॉ. जयंत नारळीकरांचं ते विधान आजही चर्चेत
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खगोल शास्त्रज्ञ तसंच विज्ञान लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वसामान्यांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत त्यांचं लेखन होतं. समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करण्यार व्यक्तिमत्त्व डॉ. नारळीकर यांचं राहिलं आहे. दरम्यान २०१८ मध्ये एका वृत्तविहिनाला मुलाखत देताना त्यांनी ब्रम्हास्त्र आणि राम राज्यावर भाष्य केलं होतं. त्यांचं हे विधान बरंच चर्चेत राहिलं होतं.
Jayant Narlikar passes away: मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
भारतात बऱ्यावेळी असा दावा केला जातो की, आधुनिक संशोधनातून जे शोध लागले आहेत ते आपल्या वेद पुराणांमध्ये आधीच होते, हे किती सत्य आहे. असा प्रश्न जयंत नारळीकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ब्रह्मास्त्रा’चा उल्लेख आपल्या वेद पुराणांमध्ये आहे. आणि त्याविशषयी असा दावा केला जातो की, ते न्यूक्लिअर डिव्हाईस होतं. म्हणजे आपल्या पूर्वजांना न्यूक्लिअर फिजिक्सविषयी चांगली माहिती असली पाहिजे. हा दावा जर मान्य केला तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे. कोणतातरी आधार असल्याशिवाय अस एकदम कोणी ते न्यूक्लिकर फिजिक्स आहे असं म्हणू शकत नाही.
ब्रह्मास्त्र क्लिअर डिव्हाईस होतं, तर मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम), याची देखील माहिती असायला हवी, त्याशिवाय न्यूक्लिअर फिजिक्सपर्यंत पुढे जाता येणार नाही. असं मानलं जर आपल्या पूर्वजांना याविषयी माहिती होती तर मग जर तुम्हाला विद्युतचुंबकीय शास्त्र माहीत होतं. याच्याच आधारावर निर्माण झालेली पंखा, दिवे यांसारख्या घरगुती वापरासाठी जी वीज उपलब्ध असायला होती, ती त्यावेळी होती का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
आज सगळे राजकीय पक्ष आजही सर्वांपर्यंत वीज पोहोचवू असंच आश्वासन देतात. हे सगळं महाभारतातील हस्तिनापुरात वा रामाच्या राज्यात उपलब्ध होतं का? तसं एखादंही उदाहरण कुठे दिसत नाही. इथं कुठेतरी गफलत आहे, अनेक गाळलेल्या जागा आहेत. त्या आधी भरून दाखवा, मगच आम्हाला विश्वास बसेल की पूर्वी याबद्दल आलल्याला सर्व माहिती होतं, असं ठाम मत त्यांनी त्यावेळी मांडलं होतं.