Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राऊतांना ड्रग्स विरोधात मोर्चा काढायचा असेल तर; त्यांनी मातोश्री व दिनो मोरयाच्या घरी काढावा”, नितेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

संजय राऊतला उडता महाराष्ट्र आठवला आहे, आणि उडता नाशिक आठवला. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असाच हा बोलत होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर हे ड्रग्स माफीया वाढले असे हा म्हणाला.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 13, 2023 | 02:25 PM
“राऊतांना ड्रग्स विरोधात मोर्चा काढायचा असेल तर; त्यांनी मातोश्री व दिनो मोरयाच्या घरी काढावा”, नितेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, नाशिकमध्ये जे ड्रग्ज सापडले याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, महाराष्ट्रात व नाशिकमध्ये उडता नाशिक अशी परिस्थिती आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत, संजय राऊतांवर निशाणा साधला. आमचे महायुतीचे सरकार आल्यानंतर संजय राऊतला उडता महाराष्ट्र आठवला आहे, आणि उडता नाशिक आठवला. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असाच हा बोलत होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर हे ड्रग्स माफीया वाढले असे हा म्हणाला. पण तुझ्यासारखे 420 जे कामगाराकडून खिचडी चोरतात, अशी बोचरी टिका राणेंनी केली.

स्वतःचे कार्यकर्ते यांच्याकडून हल्ला करून घेतला

पुढे बोलताना राणे म्हणाले की, तुझ्या मालकाचा मुलगा जो अलमी पदार्थाचा बादशहा आहे,  त्याला गृहमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी वठणीवर आणलं. रश्मी शुक्ला यांचे नाव ऐकल्यावर याच्या मालकावर झोपेची गोळी घ्यायची वेळ आली. तुला जर ड्रग्स विरोधात मोर्चा काढायचा असेल तर मातोश्री आणि दिनो मोरयाच्या घरी काढ. तुझ्या मालकाचा मुलगा त्यावेळी रोज संध्याकाळी काय फराळ घ्यायचा. ड्रग्स आणि अमली पदार्थात तुझ्या मालकाच्या मुलाने पीएचडी केली असेल. कर्जतच्या फार्म हाऊसच्या फ्रीजमध्ये आयुष्यभर पुरेल असा साठा सापडेल. संजय राऊतच्या कुटूंबाने स्वतःचे संरक्षण वाढावे म्हणून स्वतःच्या कार्यकर्ते यांच्याकडून हल्ला करून घेतला, असा आरोप नितेश राणेंंनी राऊतांवर केला.

नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती

श्रीधर पाटणकर यांच्या घरी रेड पडली होती. हे कधी हिंदुत्वासाठी पंतप्रधान यांना भेटले नाही. स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी मी भाजपात येतो हे सांगणारे उद्धव ठाकरे होते. सुनील तटकरे म्हणाले होते, उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये यायचे होते ते बोलले ते खरं बोलले. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री झाल्यानंतर कँव्हीक्शन रेट कमी झाला आहे.जे नागपूर मॉडेल आहे ते महाराष्ट्राने शिकावं. मुंबईत आमची सत्ता आली तर आम्ही मुंबईत देखील नागपूर मॉडेल आणू, दरम्यान, पुढे बोलताना राणे म्हणाले की, नारायण राणे यांच्याबाबत काही गॅंगस्टार यांना मारण्याची सुपारी दिली होती, असा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला. याबाबत उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी याचा खुलासा करावा, असं आव्हान राणेंनी ठाकरेंना दिलं.

Web Title: If sanjay raut wants to hold a march against drugs he should do it at matoshree and dino morea house nitesh rane criticism of sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 02:23 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.