Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

२०२८ मधील राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांधीनगर येथील इंडिया स्किल स्पर्धेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला केंद्राने सकारात्मक संकेत दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 15, 2026 | 09:59 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार 'राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा' (Photo Credit- X)

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार 'राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’
  • मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत
National Skill Competition Maharashtra 2028: राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातही प्रतिष्ठित राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित होणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय कौशल्य विकास मंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्री. जयंतजी चौधरी यांनी दिले आहेत. गुजरात मधील गांधीनगर इथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमातील मंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा (२०२८) महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री चौधरी यांच्या पुढे मांडला. त्यावर चौधरी यांनी याबाबतचे सकारात्मक स्पष्ट संकेत दिले.

चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या अनुषंगाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्र विभागाच्या प्रमुख फेरी स्पर्धा होत असून यात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ११७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यापुढील स्पर्धा नोएडा येथे होणार असून त्यानांनातर अंतिम स्पर्धक चीन मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

गांधीनगर इंडिया स्किल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. कौशल्य स्पर्धेचे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उज्जवल भविष्याची दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या नंतर त्यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील तरुणांना आणि विविध संस्थांमधील प्रशिक्षक यांना जगभरातल्या विविध भागात केवळ कौशल्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्यांच्या दूरदृष्टीने आज भारताच्या विकासात कौशल्य विकासाचे योगदान स्पष्ट झाले आहे.

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

प्रधानमंत्री श्री मोदीजी यांनी ‘ पीएम सेतू ‘ योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. मोदीजी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असून ही यात कौशल्य विभागाचे मोठे योगदान ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध योजना यशस्वीरित्या राबवण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात कौशल्य विकासाचे कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले. भारत हा तरुणांना देश असून युवा शक्ती हीच विकसित भारताच्या संकल्पनेतील केंद्र बिंदू असून याच आधारावर आदरणीय प्रधानमंत्री कौशल्य विकासावर भर देत असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री श्री. जयंतजी चौधरी यांनी यावेळी सांगितले.

चीन मधील शांघाय इथल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत यांत्रिकी (Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. भारतीय विद्यार्थी यात कुठेही कमी पडणार नाहीत. महाराष्ट्रातील दोन स्पर्धकांनी गेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले असून या स्पर्धेतही नेत्रदीपक यश विद्यार्थी मिळवतील असा विश्वास व्यक्त करत मंत्री लोढाजी यांनी पुढील स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Web Title: National skill competition 2028 to be hosted by maharashtra mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Central Governement
  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.