Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या हरिश्चंद्रगडावर रविवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 05:40 PM
महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दरड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दरड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना
  • दरड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
  • गड-किल्ले प्रेमी अन् भाविकांकडून हळहळ व्यक्त
ओतूर/मनोहर हिंगणे : ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या हरिश्चंद्रगडावर रविवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. गडावरून खाली उतरत असताना कड्यावरून निसटलेला दगड अंगावर पडल्याने सुरेश किसन दामसे (वय ३५) या भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत सुरेश हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी होते. या घटनेमुळे गड-किल्ले प्रेमी आणि भाविकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

​
मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीचे औचित्य साधून सुरेश दामसे हे हरिश्चंद्रगडावर दर्शनासाठी आले होते. रविवारी सकाळी दर्शन आटोपून ते जुन्नर दरवाज्याकडील खडतर पायवाटेने खाली उतरत होते. यावेळी अचानक कड्यावरील एक मोठा सैल झालेला दगड निसटला आणि थेट सुरेश यांच्या डोक्यावर व पाठीवर आदळला. या भीषण आघातामुळे ते जागीच कोसळले आणि बेशुद्ध झाले. ​अपघात घडताच परिसरातील इतर भाविकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, हरिश्चंद्रगडाची ही पायवाट अत्यंत अरुंद आणि कठीण असल्याने जखमीला खाली नेणे मोठे आव्हान होते.

​स्थानिकांनी जखमी सुरेश यांना खांद्यावरून झोळी करून सुमारे ५ किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करत खिरेश्वर गावात आणले. ​खिरेश्वर येथून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. ​मात्र, प्रचंड रक्तस्राव आणि गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासापूर्वीच मृत घोषित केले. ​सध्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने गडावर हजारो भाविकांची गर्दी होत आहे. अशा वेळी कड्यांवरील सैल दगड किंवा दरडींबाबत प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. ​या घटनेमुळे घोडेगाव परिसरात शोककळा पसरली असून, निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर भाविकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला असून, खालील मागण्या केल्या आहेत.

१)​ धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सैल दगड हटवावेत.

२)​ गडावरील कठीण वाटांवर सुरक्षेचे कठडे किंवा जाळ्या बसवाव्यात.

३) ​आपत्कालीन मदतीसाठी गडावर कायमस्वरूपी रेस्क्यू टीम तैनात असावी.

​”हरिश्चंद्रगडाची वाट आव्हानात्मक आहे, मात्र कड्यावरून दगड कोसळणे ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पुन्हा अशी वेळ येणार नाही.” — एक स्थानिक भाविक

हे सुद्धा वाचा : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Web Title: A shocking incident has taken place in which one person died due to a stone collapse at harichandragad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.