आता घर घेणं होणार आणखी महाग; रेडीरेकनरच्या दरात 5 टक्क्यांची झाली वाढ
मुंबई : आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जातात. त्यात काहींना यश मिळते तर काहींना घर घेता येत नाही. पण अनेकदा घर घेताना फसवणूक (Fraud) झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच आता महारेरा आणि सर्व महापालिका-नगरपालिका (Illegal Construction) यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने जोडण्यात येईल.
याशिवाय अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महापालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा मुंबई, ठाणे, पुणे पालिकांना प्रत्येक महिन्याला उपग्रह छायाचित्रे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट परवानगी घेऊन तसेच बनावट महारेरा नोंदणी प्रमाणपत्र जोडून अनधिकृत घरांची विक्री करून लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. त्याबाबत संजय पोतनीस, अजय चौधरी, अतुल भातखळकर, डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान फडणवीस यांनी ही माहिती दिली.