उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. कोकणवासीय कोकणात दाखल होत आहेत. मात्र दरम्यान आता हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याने चिंता वाढली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पावसाचा कोणता इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
गेले दोन ते तीन दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस राज्यात सक्रिय होणार आहे. आज सकाळपासून पुणे शहरात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणेशोत्सवात पाऊस मुंबई, पुणे शहरांसह अन्य जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागानुसार, घाट माथा आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात पाऊस हजेरी लावणार असे सध्या दिसून येत आहे. मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, व संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालणार असे चित्र सध्याच्या माहितीनुसार दिसून येत आहे.
हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. कोकण, पश्चिम महराष्ट्र व विदर्भात काही भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता.