Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: स्वेटर, छत्र्या विकत घ्या! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर…

पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गार हवा वाहताना दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 03:50 PM
India Rain Alert: स्वेटर, छत्र्या विकत घ्या! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर…
Follow Us
Follow Us:

अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणेची शक्यता 
दिल्ली-एनसीआरमध्ये वाढले तापमान 
वातावरणात सातत्याने होतोय बदल

India Weather Update: गेले काही दिवस देशातील वातावरणात (IMD) सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पठारी प्रदेशात थंडी पडताना दिसून येत आहे. तर पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. हवामान विभागाने देशातील 6 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांमध्ये 6 राज्यांमध्ये पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गार हवा वाहताना दिसून येत आहे.

कोणत्या राज्यांमध्ये पाऊस पडणार? 

हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच देशातील 13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

दक्षिण भारतात तापमानात वाढ होऊ शकते. गार वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये आजपासून 1 मार्च पर्यन्त तापमानात वाढ होऊ शकते.

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा

सोलापूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतीपिकांसह जनावरांनाही फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट वादळी वाऱ्याने द्राक्ष व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिके शेतातच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार समाधान आवताडे यांचे प्रशासनाला सूचना नुकसानीची व्याप्ती पाहता आमदार आवताडे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

IMD Weather Update: छत्र्या काढून ठेवा! देशातील ११ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; तर उत्तर भारतात पुन्हा थंडीचा जोर वाढणार

मंगळवेढ्यात अचानक सुरू झाला ढगांचा गडगडाट

मंगळवेढ्यात अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे झाले. नुकसान, पंचनामे करण्याची शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दिवसभर ढग व ऊन असा नैसर्गिक पाठशिवणीचा खेळ सुरु असताना सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट करत अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे हरभरा पिके शेतात काढून ठेवल्याने पिकांची हाणी झाल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. भोसे येथे वीज पडून एका शेतकर्याची देशी गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.

Web Title: Imd gave heavy rain and snowfall alert to india states tamilnadu kashmir weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • heavy snowfall
  • Indian Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
2

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
4

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.