पुणे: राज्यात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता हवामान विभागाने पावसाबाबत काही नवीन अंदाज वर्तवले आहेत. येणाऱ्या एक ते दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासांमध्ये म्हणजेच पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. +विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, बीड, नांदेडसह अन्य जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे १४ ते १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात तापमान हे ४५ अंशाच्या पुढे जाऊ शकते.
मुंबई, पुणे ,कोकण आणि राज्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर, काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. अवकाळीमुळे शेतीचे नुकसान
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी सरकारने एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली.
Monsoon Update: राज्यात पाऊस घेणार दीर्घ विश्रांती; IMD चा नवा अंदाज आहे तरी काय?
सांगलीत पुन्हा पावसाची हजेरी
गेल्या ५ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून सांगलीमध्ये पुन्हा हजेरी लावली. अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरूवात झाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र, सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
पुण्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः चाकण आणि परिसरात, चार दिवसांच्या उसंतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुसरीकडे, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.