राज्यात पावसाचा वेग मंदावला (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: यावर्षी २५ मे रोजीच मान्सून राज्यात दाखल झाला. पाहता-पाहता मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले. दरवर्षीपेक्षा १५ दिवस आधीच पाऊस सुरू झाला आहे. मान्सून दाखल झाल्यावर पुढील ५ ते ६ दिवस राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. सर्वत्र मुसळधार पावसाने बॅटिंग केली. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले आहे. आता हवामान विभागाने नवीन अंदाज वर्तवला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
राज्यभरात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मान्सूनचा जोर कमी झाला आहे. अजून काही दिवस पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १० ते १२ जूनपर्यंत पाऊस नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा तरी पाऊस उघडीप देईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनने राज्यात उघडीप दिली आहे. १० ते १२ जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. गेले काही दिवस सातत्याने कोसळणारा पाऊस सर्वांची चिंता वाढवत होता. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला आहे. मात्र, आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पाच ते सहा दिवस पाऊस विश्रांती घेईल. उपग्रह आणि रडारवरून मिळालेल्या हवामान नमुन्यांवर आधारित 3, 5 आणि 7 दिवसांचे अंदाज तयार केले जातात. सध्या, आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील आणि 5 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी घाई करू नका. 5 जून नंतरच पेरणी करण्याचा विचार करा, असा इशारा दिला आहे. पेरणीची घाई केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. लवकरच मान्सूनचा वेग मंदावेल आणि हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 5 जूनपर्यंत राज्यातील बहुतेक भागात कमी पावसाचा अंदाज आहे.
पाऊस 5 जूनपर्यंत विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या 5 दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे 21 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी झाले आहेत. त्यात पाण्यात बुडून, वीज कोसळून तसेच भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही प्राण्यांनाही याचा फटका बसला. तथापि, राज्याच्या वेळेच्या सुमारे 12 दिवस आधी आलेल्या मान्सूनमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे 41 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील पिकांचा हाती-तोंडी आलेला घास निसर्गाने पळवला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.