Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिल्व्हर ओकवर पवार-ठाकरे यांच्यात दीड-दोन तास महत्त्वाची चर्चा; राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि संजय राऊतदेखील उपस्थित, जाणून घ्या नेमके काय ठरले

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक'बंगल्यावर पवार आणि ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जाणून घेऊया यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Sep 12, 2023 | 07:44 PM
सिल्व्हर ओकवर पवार-ठाकरे यांच्यात दीड-दोन तास महत्त्वाची चर्चा; राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि संजय राऊतदेखील उपस्थित, जाणून घ्या नेमके काय ठरले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील तिथे उपस्थित होते.

चारही नेत्यांमध्ये खलबतं

यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील या चारही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे जवळपास दीड तास या चारही नेत्यांमध्ये खलबतं झाली. यावेळी नेमकी काय-काय चर्चा झाली, या विषयाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बैठकीनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा होणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्व मंडळी भविष्यात जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी एकत्रितपणे बसतील”, अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली.

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीत नेमकी खलबतं काय?
“इंडिया आघाडीच्या समन्वयक समितीची उद्या महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीला 13 जणांची समिती उपस्थित राहून तिथे अनेक निर्णय होतील. काही नवीन विषय समोर आलेले आहेत. महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असल्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. त्या संदर्भात कोणते विषय घ्यावेत, पुढे जावेत याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांची कॉंग्रेस नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी दुरध्वनीवर चर्चा केली. कारण काँग्रेस नेते नाना पटोले आणि इतर नेते त्यांच्या पक्षाच्या एका यात्रेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

सर्वात जास्त संभ्रम महाराष्ट्रात
“महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळं वळण घेतलं आहे, सरकार अपयशी आहे. सरकारने विशेष अधिवेशन का बोलावलं आहे या संदर्भात सर्वात जास्त संभ्रम महाराष्ट्रात आहे. नाना पटोले यांनी भूमिका मांडलीय की महाराष्ट्र तोडण्यासाठी हे अधिवेशन आहे. अनेक विषय आहेत. त्यावर चर्चा झाली”, अशी देखील माहिती संजय राऊत यांनी दिली.

 

Web Title: Important discussion between pawar and thackeray at silver oak for one and a half to two hours ncps jayant patil and sanjay raut were also present know what exactly was decided nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 07:39 PM

Topics:  

  • NCP president Sharad Pawar
  • sanjay raut

संबंधित बातम्या

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
1

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
4

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.