Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan : RSS ला आले ग्लॅमर? संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानची उपस्थिती चर्चेत; मुस्लीमांबाबत राऊतांचा रोखठोक सवाल

Salman Khan in RSS : अभिनेता सलमान खान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. यावरुन राजकारणामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यावरुन खासदार राऊतांनी टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 12:44 PM
Actor Salman Khan attendance at RSS event criticism from MP Sanjay Raut

Actor Salman Khan attendance at RSS event criticism from MP Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता सलमान खानची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती
  • वरळी डोममधील कार्यक्रमामध्ये rss च्या मंचावर सलमान खान
  • खासदार संजय राऊतांचे अनेक प्रश्न
Salman Khan in RSS : मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये व्याख्यानमाला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने (Salman Khan) उपस्थिती लावली. सलमान खानची आरएसएसच्या कार्यक्रमातील उपस्थिती आणि सहभाग यावरुन उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएसवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. खासदार राऊत यांनी सलमान खान मुस्लीम असून देखील हिंदूत्ववादी संघटना असलेल्या आरएसएसमध्ये सहभागी झाल्यामुळे प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “काल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मला ही आमंत्रण होतं. पण एक दुसरा कार्यक्रम असल्याने मला जाता आलं नाही. नाहीतर मी ही संघाच्या कार्यक्रमाला गेलो असतो. सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळालं. हे सलमान खान याचं गर्दी जमावण्यासाठी स्वागत होतं की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे,” असे म्हणत खासदार राऊतांनी चिमटा काढला.

हे देखील वाचा : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

पुढे ते म्हणाले की, “सलमान खान या नटाला व्यासपीठावर की संघात आमंत्रण होतं? संघ शाखांमध्ये यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्याचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं, कारण ज्या पद्धतीनं हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही दिवसात करण्यात आला. त्यात संघ ही सामील आहे. मोदी, फडणवीस, अमित शाह वा इतर सर्व लोक हे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत. मोदी हे संघाचेच नेते आहेत. त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांना तुम्ही व्यासपीठावर घेतलं. पण हे सलमान खान पुरतंच मर्यादीत आहे का?” असा रोखठोक सवाल खासदार राऊतांनी विचारला.

हे देखील वाचा : मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

पुढे ते म्हणाले की, “सध्या संघ आणि भाजपकडे सत्ता आहे. सध्या सत्ता आहे त्यामुळे हे लोक व्यासपीठावर आहेत. उद्या सत्ता गेल्यावर हे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा फार गंमतीचा प्रश्न आहे, हा प्रकार माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता है. ठीक आहे. सलमान खान याला बोलावलं याचं स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचंही स्वागत करा.” अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

Web Title: Actor salman khan attendance at rss event criticism from mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • RSS
  • Salman Khan
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक
1

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
2

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
3

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
4

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.