
सिंदखेडराजा: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ महायुतीनेच नाही तर महाविकास आघाडीनी आपले मोठे डाव खेळायला सुरूवात केली आहे.एका एका मतदारसंघासाठी सूक्ष्म नियोजन करून बांधणी सुरू आहे. लोकसभेत आलेल्या मोठ्या अपयशानंतर भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे शरद पवार हेदेखील आपली एक एक चाल खेळताना दिसत आहेत. पण त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. अशातच विदर्भात मुलगी आणि वडिलांमधील लढत निश्चित झाल्यावर आता विदर्भात काका-पुतणी यांच्यातही जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याचे कराण म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने आपले सुरूंग पेरायला सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे सिंदखेड राजा याठिकाणी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे मैदानात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा:अमित शाह नागपुरात असताना नितीन गडकरी आहेत कुठे; विदर्भात नेमकं चाललंय काय?
सिंदखेड राजा मतदार संघात गेल्या 25 वर्षात कुठेच विकास झाला नाही. डॉ. शिंगणे यांनी केलेली विकासाची पाच कामे तरी दाखवावीत. पण भूमिपूजन करणे, नारळ फोडणे, एवढीच कामं त्यांनी केली. पण निवडणूक आल्यावर डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांचे नावाने मतं मागतात, अशी जहरी टीकाही गायक्षी शिंगणे यांनी केली. पण वडील किंवा आजोबांच्या नावाने मतं मागण्याचा माझा विचार नाही तुमच्या वडीलांनी ज्या गोष्टी केल्या त्याच तुम्ही बंद पाडल्या, जनतेची फसवणूक केली. पण मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या 25 वर्षात इतर मतदारसंघात विकास झाला. मग सिंदखेडराजा मतदारसंघात विकास का झाला नाही. असा सवालही गायत्री शिंगणे यांनी काकांना केला आहे. मी शरद पवार साहेबांना भेटले तेव्हा त्यंच्याशी चर्चाही केली. त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्यांच्याकडे तिकीट मागितले आहे, त्यांनी तिकीट देण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार याचे मोठे नाव आहे. त्यामुळे मी शंभर टक्के निवडून येणारच असा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्यान Samsung Galaxy A14 5G फक्त 9999 रुपायांमध्ये