Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे उद्घाटन; एकूण बारा किमी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, काय असतील मेट्रोचे दर पाहा एकाच क्लिकवर

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला गेल्यानंतर त्यांच्या हस्ते मेट्रोचेदेखील उद्घाटन करण्यात येणार होते. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या बारा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. यात भूमिगत मेट्रो, गरवारे कॉलेज ते रुबी हॉल, आणि सिविल कोर्ट ते फुगेवाडी हे दोन मार्ग सुरू होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 01, 2023 | 03:03 PM
पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे उद्घाटन; एकूण बारा किमी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, काय असतील मेट्रोचे दर पाहा एकाच क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहे. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या बारा किमीच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यात भूमिगत मेट्रो, गरवारे कॉलेज ते रुबी हॉल, आणि सिव्हील कोर्ट ते फुगेवाडी हे दोन मार्ग सुरू होणार आहे. आज दुपारनंतर पुणेकर या मार्गावरून प्रवास करणार असून, पुण्यातील विविध मार्गावर मेट्रोचे तिकिटाचे दर काय असतील याबाबत माहिती घेऊयात.

VIDEO | PM Modi inaugurates metro services of Pune Metro Phase I.

(Source: Third Party) pic.twitter.com/mM8fpjhDUs

— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2023

या मार्गाचे करण्यात आले लोकार्पण
पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज करणार आहेत. यात फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत हे मार्ग आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. यानंतर वेगाने पुण्यात मेट्रोची कामे करण्यात आली.
मेट्रोद्वारे पुण्यातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार आहे. यामुळे आता पुणेकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे. पुणे मेट्रोचे दर

#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi flags off Metro trains marking inauguration of services on completed sections of the two corridors of Pune Metro Phase I and inaugurate and lay the foundation stone of various development projects at Shivaji Nagar Police… pic.twitter.com/nObaBQe2zG

— ANI (@ANI) August 1, 2023

असे आहेत पुणे मेट्रोचे दर
वनाझ ते रुबी हॉल : २५ रुपये
पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ३० रुपये
वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ३५ रुपये
रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ३० रुपये
वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान / पीएमसी: २० रुपये
वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन: २५ रुपये
रुबी हॉल ते शिवाजीनगर : १५ रुपये
रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : २० रुपये
पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ३० रुपये

🎥 Watch a short film tracing the completed sections of the two corridors of Pune Metro Phase I.🚉

The design of some of the metro stations on the route draws inspiration from Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/VOUMmDXuZP

— PIB India (@PIB_India) August 1, 2023

असा आहे पुणे मेट्रो प्रकल्प
पीसीएमसी ते स्वारगेट (१७.४ किमी, १४ स्थानके)
वनाझ ते रामवाडी (१५.७ किमी, १६ स्थानके)
एकूण ३३.२ किमी, ३० स्थानके
६ मार्च २०२२ रोजी उदघाटन झालेले भाग
पीसीएमसी ते फुगेवाडी – ७ किमी, ५ स्थानके
वनाझ ते गरवारे – ५ किमी, ५ स्थानके
एकूण १२ किमी, १० स्थानके
नवीन उदघाटन होणारे भाग
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट – ६.९ किमी, ४ स्थानके
गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक – ४.७ किमी, ७ स्थानके
एकूण ११.६ किमी, ११ स्थानके
४) उर्वरित मार्गांचे नियोजन
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी – सप्टेंबर २०२३
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट – डिसेंबर २०२३
नवीन उदघाटन होणाऱ्या भागांमुळे होणारे फायदे
i) पुणे आणि पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रो द्वारे जोडली जाणार
ii) नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडतो त्यामुळे लाखो पुणेकरांना याचा फायदा होणार आहे.
iii) एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमीचे मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित
iv) प्रवासाच्या वेळेमध्ये ५० % घट, पुण्याची वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार
v) पुणे रेल्वे स्थानक व शिवाजी नगर येथे भारतीय रेल्वे सोबत एकीकरण
vi) डेक्कन, शिवाजीनगर आणि PMC येथे PMPMLसेवेबरोबर एकीकरण
तिकीट घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध
तिकीट खिडकी
तिकीट व्हेंटीमशीन
क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे, मेट्रो कार्ड द्वारे
मेट्रो अँप, whats App तिकीट
सर्व UPI, Digital Payment द्वारा सुविधा
विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये ३०% सवलत
(शनिवार, रविवार सर्वाना ३०% सवलत)
मेट्रो कार्ड धारकांना १०% सवलत
७. सिव्हिल कोर्ट स्थानकाची वैशिष्ठे
i) १८ सरकते जिने व ८ लिफ्टने सज्ज
ii) जमिनीखाली १०८ फूट (३३.१ मी) भारतातील सर्वांत खोल स्थानकांपैकी एक.
iii) थेट फलाटावर सूर्य प्रकाश पडेल अशा रितिने स्थानकाचे बांधकाम
iv) सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असून दोन्ही मार्गिका येथे एकमेकांना मिळतात.
v) भविष्यात हिंजेवाडी मेट्रो (PMRDA) मार्गिकेचे शिवाजीनगर स्थानक पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

Web Title: Inauguration of pune metro by showing green flag at hands of pm modi inauguration of total 12 km metro line what will be metro fares nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 03:02 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Prime Minister Modi

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
3

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.