CP Radhakrishnan files nomination for Vice President Elections 2025 PM Narendra Modi proposer
c p radhakrishnan : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली. अनेक नावे चर्चेमध्ये असताना भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली. सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल देखील आहेत. दरम्यान, सी पी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
सी पी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीपी राधाकृष्णन यांच्या नावाचे प्रस्तावक बनले आहेत. यावेळी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच समर्थक नेते उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री जितन राम मांझी, चिराग पासवान यांच्या उपस्थितीत उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
#WATCH | NDA candidate for Vice President post, C.P. Radhakrishnan files his nomination in the presence of PM Narendra Modi. pic.twitter.com/nYEWPdNqpx
— ANI (@ANI) August 20, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कशी असणार निवडणूक प्रक्रिया?
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख आहे. तर नामांकनांची छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे. तर 9 तारखेला मतदान झाल्यानंतर मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जोरदार चर्चेचा विषय ठरली असून कोण हे पद मिळवणारे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण आहेत सी पी राधाकृष्णन?
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना दीर्घ आणि प्रभावी राजकीय अनुभव आहे. ते ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. राधाकृष्णन यांच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांना कधीकधी ‘तामिळनाडूचे मोदी’ असेही म्हटले जाते. त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना हे टोपणनाव मिळाले. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये पक्ष मजबूत केला, त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये पक्षाचे स्थान मजबूत करण्यात राधाकृष्णन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. ते फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल होते. या काळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारी सोपवली. त्यानंतर आता त्यांना उपराष्ट्रपती म्हणून एनडीएकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधकांकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी
उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे असणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर विरोधी पक्षांनी एकमताने सहमती दर्शविली आहे. न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
बातमी अपडेट होत आहे.