Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त दंड ठोठावला होता. त्यांनी म्हटले होते की भारत युद्धाच्या इंजिनला इंधन देत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 20, 2025 | 06:41 PM
राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

India-Russia Oil Trade: ट्रम्प यांच्या धमकीकडे दुर्लक्ष करून भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. यामुळे रशियाने खुश होऊन भारताला एक मोठी भेट दिली आहे. रशियाने भारताला तेल पुरवठ्यावर ५% सूट देण्याची घोषणा केली आहे. रशियाचे उप-व्यापार प्रतिनिधी एव्हगेनी ग्रिवा यांनी सांगितले की, ही सूट व्यावसायिक चर्चेवर अवलंबून असेल.

जकीय दबावांना न जुमानता भारत-रशिया ऊर्जा भागीदारी कायम

राजकीय दबाव असूनही भारत रशियाकडून तेलाची आयात करत आहे आणि ही आयात कधीही थांबवलेली नाही, असे त्यांनी सांगितले. हे भारत आणि रशिया यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक आहे. रशियाबद्दल भारताची ही भूमिका दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत करत आहे. दरम्यान, रशियाचे उप-प्रमुख मिशन रोमन बाबुश्किन म्हणाले की, “भारत आणि रशिया जुने मित्र आहेत आणि त्यांचे संबंध खूप मजबूत आहेत. बाहेरील दबावांना न जुमानता भारत-रशियाची ऊर्जा भागीदारी कायम राहील.”

Regarding oil import prices amid tariffs, Evgeniy Griva, Deputy Trade Representative of Russia to India, said, a 5% swing is possible subject to negotiation.

(Source: Russian Embassy in India) pic.twitter.com/TD1ld0qEgH

— ANI (@ANI) August 20, 2025

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर

“भारत युद्धाला निधी पुरवतोय”-अमेरिकेचा आरोप 

दुसरीकडे, अमेरिका सातत्याने भारताच्या तेल खरेदीवर आक्षेप घेत आहे. व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले आहे की, “भारत रशियन तेलासाठी जागतिक ‘क्लियरिंग हाऊस’ बनला आहे. भारत रशियाकडून निर्बंध असलेला तेल खरेदी करून त्याला उच्च किमतीच्या निर्यातीत रूपांतरित करत आहे, ज्यामुळे मॉस्कोला डॉलर मिळत आहेत.” या आधारावर अमेरिकेने भारतावर ५०% शुल्क (टॅरिफ) लादले आहे, ज्याचा थेट परिणाम टेक्सटाईल, मरीन आणि लेदर निर्यात यांसारख्या क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे.

भारताचा पलटवार

भारताने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. सरकारने या निर्णयाला “अनुचित, अन्यायपूर्ण आणि असंगत” म्हटले आहे. तसेच, आर्थिक दबावापुढे झुकण्याचा प्रश्नच नाही, असेही स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, भारत आपल्या आर्थिक धोरणांमध्ये कोणत्याही बाह्य दबावामुळे मागे हटणार नाही.

रशियावर अप्रत्यक्ष दबाव

अमेरिकेच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्काचा उद्देश रशियावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करणे आहे. अध्यक्षांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांना युद्ध संपवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारतावर लावलेले निर्बंध देखील समाविष्ट आहेत.”

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

अमेरिकेने यापूर्वीच चेतावणी दिली होती की, जर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर मॉस्कोवर आणखी निर्बंध लादले जातील आणि रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही सेकेंडरी सँक्शन्स (दुय्यम निर्बंध) लागू केले जातील. सध्या चीन आणि भारत हे रशियाकडून तेल खरेदी करणारे शीर्ष दोन देश आहेत.

Web Title: India russia oil deal 5 percent discount us displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • international news
  • PM Narendra Modi
  • Russia

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर
3

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.