Satara News : रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूच्या घरावर आयकरचा छापा; राष्ट्रवादीतील घरवापसीपूर्वी मोठी घडामोड
सातारा : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागाकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.
हेदेखील वाचा : Crime News: कोरेगाव भीमामध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह पोलिसांनी रोखला; वाचा संपूर्ण प्रकरण
बुधवारी सकाळीच आयकर विभागाचं एक पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं. आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी करण्यात आली. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाल्या. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती आहे.
दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याप्रमाणे रघुनाथराजे नाईक निंबाळकर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहे. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ओडिशामध्ये आयकर विभागाचा छापा
आयकर विभागाकडून ओडिशामध्ये छापा टाकण्यात आला आहे. जो सलग 10 दिवस चालला आहे. या छाप्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य निर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकले. या कालावधीत 352 कोटी रुपयांची मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा छापा विशेषत: त्याच्या आकारमानामुळे आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आयकर विभागाची ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
हेदेखील वाचा : Dhananjay Munde Alligations: ‘माझं राजकीय करीयर संपवण्याचा प्रयत्न…’; धनंजय मुंडेंचा आरोप कुणावर