पोलिसांनी रोखला बालविवाह (फोटो - istockphoto )
शिरूर: कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी रोजी विवाह करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे, महेंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई रुपाली खोटे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, पोलीस पाटील मालन गव्हाणे, आशा सेविका कविता कांबळे यांनी विवाहस्थळ गाठले,.
दरम्यान ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी महिला व बाळ विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत बालविवाह बाबत फॉर्म व माहिती भरुन घेत नवरदेव मुलगा, त्याचे आई वडील, भाऊ, मामा, अल्पवयीन नवरी युवतीसह तिचे आई वडील, चुलते व नातेवाईक यांची नावे लिहून घेत नवरी व नवरदेव यांचे ओळखपत्र घेऊन सदर बालविवाह रोखून पालक व नातेवाईक यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
तसेच अल्पवयीन युवतीचा विवाह करणे म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा असल्याची संपूर्ण माहिती देत अल्पवयीन युवती अठरा वर्षाची पूर्ण होई पर्यंत विवाह न करण्याबाबत समज दिली त्यावेळी सदर अल्पवयीन युवतीच्या पालकांनी विवाह करणार नसल्याचे सांगत त्याप्रमाणे पोलिसांना लेखी स्वरुपात जबाब देखील लिहून दिले आणि त्यानंतर होणारा विवाह हा रद्द झाला असून शिक्रापूर पोलिस तसेच कोरेगाव भीमाचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन युवतीचा बालविवाह रोखला गेला आहे.
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त
राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे. तसेचं वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.
हेही वाचा: शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे- नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले.