धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट
मुंबई: “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५९ दिवस एकाच व्यक्तीचे, एका जिल्ह्याचे, एका जातीचे आणि एका गावाचे मीडियाद्वारे परीक्षण होत आहे. माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिड-दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप होत आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दमानियाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनीदेखील पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे, संतोष देशमुख प्रकरण आणि अंजली दमानियांच्या विविध आरोपांवर ठामपणे आपली भूमिका मांडली.माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, का असा सवाल विचारला आहे. “जर मुख्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार माहीत नसतील आणि दमानिया यांना ते माहित असतील, तर तुम्ही त्या विश्वासावर ठाम राहाल का? जर तुमच्याच संपादकांना त्यांचे अधिकार माहीत नसतील आणि आमच्यासारख्या नेत्यांना येऊन हे म्हणावं लागलं, की संपादकांना अधिकार नाही, तर त्यावर तुम्ही काय मत मांडाल? हे काय चांगलं पत्रकारितेचं उदाहरण आहे? माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे?” असे त्यांनी कडक शब्दात विचारले.
निरोगी चिमुकलीला कुष्ठरोगी ठरवले, चुकीच्या औषधांमुळे गमवावा लागला जीव
धनंजय मुंडे म्हणाले, “माझं राजकीय आयुष्य जनतेच्या हाती आहे. देशाच्या इतिहासात ५९ दिवस एका व्यक्तीचे, एका जिल्ह्याचे, एका जातीचे आणि एका गावाचे मीडियाद्वारे परीक्षण होत रा हिलं. देशात एवढ्या मोठ्या घटना घडल्या आणि त्याची काही तासांसाठीही न्यूज व्हॅल्यू राखली गेली नाही. मात्र आमचं प्रकरण ५९ दिवस चाललं. पण यामागे कोण आहे, काय नाही, ते शोधा,” असही धनंजय मुंंडेंनी स्पष्ट केलं.
धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीवर देखील भाष्य केले. “ज्यांच्यावर आरोप होत होते, त्यांच्याच दारावर जावं लागलं. माझ्या नेतृत्वावर जे आरोप केले गेले ते खरे ठरले नाहीत. आता माझ्याच नेतृत्वाकडे माझ्याविरोधात आरोप करावे लागतात, हे योग्य आहे का? मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासमोर सर्व काही मांडलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलं आहे. काही लोकांना असा विचार केला जातो की एखाद्याला बदनाम करणे आणि त्या प्रकरणात घोटाळा घालणे हे योग्य आहे. काहींना असं वाटत असेल की हे सर्व कठीण जातंय. पण जर संवैधानिक पदावरून मोकळं होऊ शकलं तर ते सर्वाचं आहे,” असे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
Phalodi Satta Bazar: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला