Increased feeding of pigeons may increase risk of lung disease satara news
सातारा : शहरी भागांमध्ये वाढत्या कबूतरांची संख्या आणि त्यांना दाणा पाणी खायला घालण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
मुंबईत कबुतरांना पाळणे किंवा त्यांना खायला घालण्यावरुन आणि सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या कबूतरखान्यावरुन आता कायदेशीर संघर्ष पेटला आहे. साताऱ्यातही कबुतरांच्या ढवळी आणि त्यांच्यावर व्यक्त होणारी भूतदया दिसून येत असून हे प्रेम आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते. साताऱ्यातील अनेक निवासी इमारतींच्या कोनाड्यात कबुतरांची घरटी आणि त्यांचा वावर हा धोकादायक ठरू लागला आहे.
सातारा शहरातील विशेषत: शाहूपुरी राजवाडा परिसर, बसपा पेठ, सदर बाजार, तामजाई नग, भोसले मळा आदी ठिकाणच्या बऱ्याच सोसायटी, आपार्टमेंटमध्ये कबुतरांच्या वाढत्या संख्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे काही वर्षांपूर्वी सोमवार पेठेतील एका उद्यानात कबुतराची ढाबळ ठेवण्यावरून मोठा वाद रंगला होता. तसेच बसपा पेठेत ओढ्याच्या काठाला मोठी कबुतरांची ढाबळ असून तेथे कबुतरांना हौसेने दाणे खायला घातले जातात ते सुद्धा ती कृती सुद्धा सातारकरांच्या दृष्टीने धोकादायक आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपाययोजना करणे आवश्यक
सोसायटीच्या डकमध्ये आणि रिकाम्या ठिकाणी बर्ड नेट लावणे, कबुतरांना अन्न देणारा रहिवाशांना सूचना देणे, सोसायट्यांमधून जनजागृती पत्रकांचे वाटप करणे, याबाबत बैठक घेऊन रहिवाशांना आवाहन करणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालिकेच्या उपायोजनाची माहिती देणे हे देखील गरजेचे आहे. सातारा नगरपालिकेने सुद्धा हा प्रकार गांभीर्याने घ्यावा अशी परिस्थिती आहे. सातारा शहरांमध्ये किमान ३६ हजार सदनिका असून यामध्ये साडेतीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संपर्क व सहवाद टाळणे अत्यंत महत्वाचे
कबुतराच्या संपर्कात राहिल्यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनिटीस हा आजार होऊ शकतो. हा फुफुसाचा दुर्मिळ आजार आहे यामध्ये फुफ्फुसाला गंभीर स्वरूपाची इजा होऊन श्वसनक्षमता कमी होते कबुतरांच्या विस्तार किंवा पंखांच्या संपर्कात बराच काळ राहिल्यामुळे हे होऊ शकतं. कबुतरांमुळे फुफुसाचा ताजा नाही, तर त्वचारोदेखील होऊ शकतो कबुतराच्या पिसांमुळे किंवा त्या पिसांमध्ये असल्याने कीटकांमुळे त्वचारोग होतो. कबुतरांना खायला देणे ही चांगली सवय असली तरी आपल्या आरोग्याला होणार धोका टाळला जाणे महत्त्वाचे आहे. काही विशिष्ट पंथासाठी या प्राण्याचे महत्त्व असले तरी त्यांचा मर्यादित सहवास आणि त्याचा संपर्क टाळणे हेच अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.