Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajit Sawant : “कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर…”, अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

Indrajit Sawant on prashant koratkar: प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तेलंगणा येथून कोरटकर याला ताब्यात घेतले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2025 | 06:03 PM
कोरटकरला अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य-X)

कोरटकरला अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Indrajit Sawant on prashant koratkar In Marathi: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान आता कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया कोरटकरला अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे.

prashant koratkar News: मोठी बातमी! शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील.

इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

यावेळी “ज्या व्यक्तींनी कोरटकरला वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांचा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवे. तसेच वकिलांनी न्यायालयात बाजू चांगली मांडली त्यामुळे कोरटकरला वाचविणाऱ्यांनी त्याला सांगितले असेल की आता तुझ्यासमोर कोणताही पर्याय नाही,” असं देखील इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.

Kunal Kamra Controversy : फक्त शिंदे नाही तर राहुल गांधींवरही साधला होता निशाणा; कुणाल कामराचा जुना व्हिडिओ व्हायरल

Web Title: Indrajit sawant indrajit sawant first reaction after koratkar arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Prashant Koratkar
  • Telangana

संबंधित बातम्या

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
1

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

Telangana Blast: तेलंगणा ब्लास्ट घटनेत आतापर्यंत 39 मृत्यू; तर ढिगाऱ्याखाली अजूनही…
2

Telangana Blast: तेलंगणा ब्लास्ट घटनेत आतापर्यंत 39 मृत्यू; तर ढिगाऱ्याखाली अजूनही…

BJP New State President : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला
3

BJP New State President : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

Telangana Blast: मोठी बातमी! तेलंगणामध्ये फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार तर 14 जखमी
4

Telangana Blast: मोठी बातमी! तेलंगणामध्ये फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार तर 14 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.