प्रशांत कोरटकर हा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद विधान आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यामुळे कळंबा कारागृहात आहेत. आता इंद्रजीत सावंतांकडून त्याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून सब जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकरला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी दोन वेळा प्रत्यक्ष हजर करताना कोरटकरवर शिवभक्तांकडून हल्ला…
वसभर पोलिसांकडून कोरटकर याची कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्याने इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला असून मोबाईलमधील डाटा देखील स्वतः डिलीट केल्याची कबुली दिली आहे.
प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलिसाच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास तेलंगणा येथून अटक केली होती. रात्रभर सुमारे 12 तासांचा प्रवास केल्यानंतर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोचले.