
रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंनी स्थानिकांच्या समस्यांवर केलेले भाष्याला त्यांनी अनुमोदन देत, उद्धवजींच्या सूचनेचा आम्ही आदर करतो. असे सांगितले. सर्वच नेत्यांची इच्छा आहे की, आता स्थानिकांच्या समस्यांचा, शंकांचा विचार करीत प्रथम त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावावा. याचे आम्ही समर्थन करीत, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा तसेच आदेश दिले आहे. त्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही.
उदय सामंत यांचे महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरेंवर टीका : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाला एका बाजूने सहमती दर्शवली असली, तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केवळ मुख्यमंत्र्यांवरच ते बोलत होते. कोकणातील बारसू रिफायनरीच्या प्रकल्पावर ते फार कमी बोलले. उद्धव ठाकरे हे बारसूतील स्थानिकांवर बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक बोलले.
बारसू रिफायनरी प्रकल्प
बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये स्थानिकांच्या आंदोलनचा लढा जोरदारपणे सुरू असताना त्यादिवशी आंदोलन चिघळून आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये मोठी झटापटसुद्धा झाली. या आंदोलकांमध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरच्या लोकांचा अधिक भरणा होता. कोकणातील सर्व घडामोडींवर आपले लक्ष्य असणार आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा आज कोकण दौरासुद्धा आहे. तसेच, राज ठाकरेसुद्धा आज कोकण दौरा करणार आहेत. त्यामुळे आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे पत्रकार परिषद घेतली असे वाटत होते.