Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा! ७४२ रुपये प्रीमियम भरला अन् विम्याच्या नावाखाली मिळाले अवघे १८३ रुपये

शासकीय स्तरावर ५० टक्के नुकसान गृहीत धरले जात असताना विमा - कंपन्यांनी मात्र १ टक्का नुकसान दाखवून - ही मदत जाहीर केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 10, 2026 | 05:50 PM
Nashik News: शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा! ७४२ रुपये प्रीमियम भरला अन् विम्याच्या नावाखाली मिळाले अवघे १८३ रुपये
Follow Us
Close
Follow Us:
  • येवल्यात पीक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार
  • विम्याच्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई
  • नुकसान झाल्यावर कंपनी आम्हाला भिकारी समजून तुटपुंजी मदत देते
Nashik News: येवला शासनाकडून पिकांचे ५० टक्के नुकसान गृहीत धरून मदत जाहीर केली जात असताना, पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. तालुक्यातील साताळी येथील एका शेतकऱ्याला मका आणि सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याच्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील साताळी येथील शेतकरी संदीप मच्छिंद्र कोकाटे यांनी ‘ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’कडे मका पिकासाठी ३३४ रुपये आणि सोयाबीनसाठी ४०८ रुपये असा एकूण ७४२ रुपये प्रीमियम भरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांना मक्यासाठी ३३,४८० रुपये तर सोयाबीनसाठी २७, २५० रुपये भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, विमा कंपनीने नुकसानीची टक्केवारी केवळ १ टक्का दाखवून मका पिकासाठी अवघे १८३.२१ रुपये मंजूर केले आहेत. सोयाबीनसाठी अद्याप छदामही मिळाला नाही.

विमा कंपन्यांकडून आकडेवारीचा खेळ?

शासकीय स्तरावर ५० टक्के नुकसान गृहीत धरले जात असताना विमा – कंपन्यांनी मात्र १ टक्का नुकसान दाखवून – ही मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि विमा कंपनीचा – अहवाल यात मोठी तफावत असल्याने, विमा कंपन्या नेमके कोणाचे हित जोपासत आहेत? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. प्रीमियम म्हणून भरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कमही भरपाई म्हणून मिळत नसल्याने ही शेतकऱ्यांची कुचेष्टा असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.

Puducherry Election: पुदुच्चेरीत काँग्रेस-भाजप समर्थकांत राडा; तीन राज्यांत २९६ जागांसाठी उत्साहात मतदान

दाव्याचा तपशील असा

अर्ज क्रमांक: ०४०१२७२५००११८२६३५६७०१
नुकसान टक्केवारी: १.०२ टक्के
क्षेत्र टक्केवारी टक्के
एकूण दावा रक्कम रुपये ३४१.५४
देय दावा रक्कम रुपये १८३.३२
अर्ज क्रमांक: ०४०१२७२५००११८२६३५६७०१, नुकसान टक्केवारी १.०२ टक्के क्षेत्र टक्केवारी: ० टक्के एकूण दावा रक्कमः ० रुपये
“देय दावा रक्कमः १५८.२२ रुपये

Jalgaon News : जिल्हा कारागृहांना ‘गँगवार’चा धोका? लहान जेलमध्ये कुख्यात गुंडांचा भरणा

66 आम्ही मोठ्या आशेने विम्याचा हप्ता भरतो, पण नुकसान झाल्यावर कंपनी आम्हाला भिकारी समजून तुटपुंजी मदत देते. ७४२ रुपये भरून जर १८३ रुपये मिळणार असतील, तर या योजनेचा फायदा काय? ही आमची चेष्टा आहे. अस्मानी अन् सुल्तानी संकटांनी बळीराजा गेल्या काही वर्षांपासून बेजार आहे. त्यात्त आता है संकट आल्याने अजून चिंता वाढली आहे.
संदीप कोकाटे, पीडित शेतकरी, साताळी

सखोल चौकशी करण्याची मागणी

मका पिकासाठी केवळ १८३ रुपयांचा दावा मंजूर, सोयाबीन पिकाची भरपाई अद्याप खात्यावर जमा नाही. शासन ५० टक्के नुकसान म्हणतेय, कंपनी मात्र १ टक्काच गृहीत धरतेय. कृषी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. येवला तालुक्यातील या प्रकरणामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात पीक विमा योजनेव्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित इराले आहे. कृषी विभाग आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Insult to farmers yeola farmer gets only 183 as insurance claim after paying 742 premium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Crop Insurance
  • Farmer Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.