Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : न्याय, हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का? संतप्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला सवाल

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप जाहीर केला आहे. न्याय, हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का? असा सवाल देखील संतप्त कंत्राटीदारांनी सरकारला विचारला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 02, 2025 | 12:36 PM
Thane News : न्याय, हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का? संतप्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला सवाल
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे :  न भूतो, न भविष्यती असे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी 19 ऑगस्टपासून सुरू केले आहे. यास पाठिंबा देत राज्यभरातून सुमारे 30 हजारांहून अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. परिणामी, याचा मोठा फटका आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता निर्माण झाली, असं असतानाही चर्चेतून तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाकडून कारवाईचे फर्मान सोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर, संविधानिक मर्यादा पाळून न्याय व हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य एकत्रिकरण समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून केला.

यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक दिलीप उटाणे, बबलू पठाण, ॲड. भाग्यश्री रंगारी, श्याम गायकवाड, मनीष खैरनार जीवन कुलकर्णी, डॉ.प्रकाश मोरे, दत्ता मुळे, गौरव जोशी डॉ गायकवाड डॉ राम नागे हर्षल रनवरे परिमल फुके उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी संघटनेचे राज्यस्तरीय आज ठाणे येथे पार पडली. या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातून 3 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. शासनाने बैठकीची वेळ द्यावी व सदर बैठकीमध्ये कालबद्ध कार्यक्रम मंजूर करावा, असे झाल्यास त्याक्षणी संप मागे घेतला जाईल. असा निर्धार यावेळी करण्यात आला. माननीय मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त अशी एकत्रित बैठक घेण्याची आग्रही भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली.

बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना गायकवाड म्हणाले की, दहा वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, असा शासन निर्णय 14 मार्च 2024 मध्ये  घेण्यात आला. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. आम्ही वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेत पाठपुरावा केला. चर्चा, बैठका यांस प्राधान्य दिले. मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र मुख्यमंत्री महोदय, आरोग्य सचिव यांच्याशी एकत्रित बैठकीचे दिलेले आश्वासन त्यांनी अद्याप पूर्ण केले नाही. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील अखत्यारीत असणाऱ्या वेतनवाढ, विमा संरक्षण, समान काम, समान वेतन यांसारख्या प्राथमिक मागण्यांवर देखील वारंवार पाठपुरावा करूनही साधी चर्चाही झाली नसल्याचे त्यांनी खेदाने सांगितले.

तसेध कोणत्याही अतिरिक्त आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करणारा, कोरोनासारख्या संवेदनशील कालावधीतही दिवस रात्र झटणारा, 15 ते 20 वर्षाहून अधिक काळ निष्ठेने सेवा करूनही वेतन नव्हे तर मानधन तत्वावर काम करणारा आमचा सेवक आज रस्त्यावर उतरल्यावर तुम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी थेट कारवाईचा आदेश काढता? लोकशाही आहे की मोगलाई ? असाही थेट प्रश्नही गायकवाड यांनी प्रशासनाला केला.

उटाणे म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना 150 दिवसाचे नियोजन करण्याचे सांगितले होते. त्यामध्ये आरोग्य विभागाने देखील समायोजनाचा विषय घेतला होता, असे समजते. सदर कालावधी संपण्याकरिता आता केवळ 29 दिवस शिल्लक असूनही प्रशासनाने आमच्या संघटनेची साधी बैठकही घेतली नाही. समायोजनाव्यतिरिक्त सचिव स्तरावरील निर्णयातून मार्गी लागू शकणारे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु याचे गांभीर्य नाही, हेच त्यांच्या कृतीतून दिसते.

म्हणूनच कोणत्याही कारवाईला बळी न पडता झोपेचं सोंग घेऊन निद्रिस्त झालेल्या शासन व प्रशासनाला जाग करण्यासाठी पुकारलेल्या या संपातून आता आम्ही कोणीच माघार घेणार नाही. लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कालावधी नमूद केल्याशिवाय कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील, असे सर्व राज्य समन्वयकांनी एकमताने सांगितले.

Manoj Jarange News: मराठ्यांना हुसकावून लावू नका…; जरांगेचा फडणवीस सरकारला थेट इशारा

Web Title: Is fighting for justice and rights a crime angry health workers question the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन
1

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन

Thane Crime Case : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; शहरातील 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त
2

Thane Crime Case : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; शहरातील 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त

Thane News : अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात; मनपा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
3

Thane News : अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात; मनपा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

Thane News : विसर्जनाच्या नावाखाली डम्पिंग ग्राऊंडवर गणेश मूर्तींची विल्हेवाट; डायघर गावातील धक्कादायक प्रकार
4

Thane News : विसर्जनाच्या नावाखाली डम्पिंग ग्राऊंडवर गणेश मूर्तींची विल्हेवाट; डायघर गावातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.