Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

जल जीवन मिशन योजने अंतर्गत कामांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 38 कोटी या योजने अंतर्गत मंजूर असताना फक्त 17 कोटी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम त्वरीत अदा करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2024 | 02:21 PM
कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तर या बैठकीला स्थानिक आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. मुंबईत ही बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा अंदाजपत्रक सादर केलेली कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियान

मात्र या योजने अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी अद्याप 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या योजनेतील उर्वरित रक्कम त्वरीत अदा करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्टाफ कमी असल्यामुळे बहुतेक कामं प्रलंबित आहेत. या कामांचा आढावा घेत लवकरात लवकर नव्याने स्टाफ भरून प्रलंबित कामं मार्गी लावावीत असे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

परिपूर्ण सर्वे झालेला नसल्याने जल जीवन मिशनच्या अनेक योजना अपुऱ्या व अर्धवट स्थितीत राहिल्या होत्या. यामुळे काही ठिकाणी अनेक वाड्या, वस्त्या या योजनेपासून वंचित राहत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देण्याची मागणी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. तसेच कणकवली मतदारसंघातील जलजीवन योजनेच्या कामांकरता 38 कोटीची आवश्यकता होती, त्याप्रमाणे निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील 17 कोटी रक्कम प्राप्त झाली असून बाकी असलेली रक्कम देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ ही रक्कम देण्याचे आदेश दिले.

हेदेखील वाचा- पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने महिलेला इतकं फरफटतं नेलं की…, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्यासह जलजीवन मिशनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जल मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला सूचनांमुळे प्रलंबित असलेली कामे अधिक गतिमान होणार आहेत.

बैठकीत कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असाणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 38 कोटी या योजने अंतर्गत मंजूर असताना फक्त 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम त्वरीत अदा करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Web Title: Jaljeevan mission in kankavli legislative assembly will speed up as it will get the remaining funds as per gulab rao patils order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • Gulabrao Patil

संबंधित बातम्या

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या
1

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या

“संजय राऊत माझा प्युअर माल…”; उबाठा-मनसे युतीवरून गुलाबराव पाटलांच्या ‘फटक्यां’नी गाजली सभा
2

“संजय राऊत माझा प्युअर माल…”; उबाठा-मनसे युतीवरून गुलाबराव पाटलांच्या ‘फटक्यां’नी गाजली सभा

Gulabrao Patil: “वसई विरार क्षेत्रातील नळजोडणी…”; मंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश
3

Gulabrao Patil: “वसई विरार क्षेत्रातील नळजोडणी…”; मंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश

विद्यार्थ्यांच्या मागे ED आणि CBI लावता काय…? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार
4

विद्यार्थ्यांच्या मागे ED आणि CBI लावता काय…? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.