Jalna: 'श्रीक्षेत्र अनवा' येथे माघी यात्रा उत्सवात भक्तीचा संगम, 'या' तारखेपासून होणार प्रारंभ
जालना: महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या जालना येथील भोकरदन तालुक्यातील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र अनवा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा होणार आहे. ३००-३२५ वर्षांपूर्वी सुरु झालेली ही परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. संतश्री विठोबा दादामहाराजांनी इ. स.१७३० साली भगवान श्री पांडुरंग व आईसाहेब रुक्मिणी मातेची स्थापन केली तेव्हा पासून उत्सवाची परंपरा अखंड आहे.
माघी उत्सव ७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रारंभ होईल आणि १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहील. या उत्सवात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, खानदेश,विदर्भ आणि इतर भागांतील हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
उत्सवाचे प्रमुख कार्यक्रम
माघ शुद्ध दशमी (७ फेब्रुवारी २०२५)
सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आणि नगर प्रदक्षिणा आयोजित केली जाईल. त्यानंतर रात्री कीर्तन सेवा होईल.
माघ शुद्ध एकादशी मुख्य दिंनी (८ फेब्रुवारी २०२५)
दुपारी १२:३० वाजता वारकरी पूजन सोहळा होईल. यानंतर १ वाजता भगवान श्री पांडुरंगाची रथातून भव्य मिरवणूक (रथोत्सव) होईल, ज्यामध्ये दिंडी सोहळ्याचा समावेश असेल.
माघ शुद्ध द्वादशी (१० फेब्रुवारी २०२५)
सायंकाळी ५:३० वाजता सद्गुरु परमपूज्य श्रीज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य उत्सवाची सांगता होईल.
श्रीक्षेत्र अनवा आणि त्याची धार्मिक महत्त्व
श्रीक्षेत्र अनवा हे प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते, येथे पुरातन वारकरी श्रीगुरुभक्तिपीठ आहे, ज्या भाविकांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, ते याठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. यंदा २७१ वा माघ वारी उत्सव संस्थानचे पंधरावे विद्यमान पीठाधिश प.पू.सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न होत आहे, भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: भारत-चीन संबंध सकारात्मकतेच्या दिशने; कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार, विमानसेवाही पूर्ववत
कैलास मानसरोवर यात्रा कधी असते?
कैलास मानसरोवर यात्रेवर हिंदूंची मोठी श्रद्धा आहे. 2020 पर्यंत कैलास मानसरोवर यात्रा दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जात होती. यंदाही जून महिन्यात हा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. हिंदू मान्यतेनुसार, ‘मानसरोवर’ हे सरोवर आहे, जे ब्रह्मदेवाने स्वतःमध्ये निर्माण केले आहे. असे मानले जाते की कैलास पर्वत हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे जेथे ते देवी पार्वतीसोबत निवास करतात.
कैलास मानसरोवर यात्रा कुठून सुरु होते?
नेपाळ आणि भारतातून कैलास मानसरोवरला रस्त्याने भेट दिली जाते. नेपाळची राजधानी काठमांडू येथून रस्त्याने प्रवास सुरू होतो. यात्रेकरू काठमांडूला थेट विमानाने जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो, कैलास मानसरोवर यात्रा उत्तराखंड, दिल्ली आणि सिक्कीम राज्य सरकारांच्या सहकार्याने आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या सहकार्याने आयोजित केली जाते. यासोबतच कैलास मानसरोवरची यात्राही हेलिकॉप्टरने पूर्ण करता येणार आहे.