
छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच 'गोल्फ प्रीमियर लीग'! (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (नवराष्ट्र प्रतिनिधी): गोल्फ खेळ हा आजपर्यंत श्रीमंताचा खेळ म्हणून ओळखला जात होता आणि तो केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. मात्र, शहराचा औद्योगिक विस्तार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचे आगमन पाहता, एमजीएम (MGM) संस्थेने पडेगाव परिसरात मराठवाड्यातील पहिले अद्ययावत गोल्फ मैदान उभे केले आहे.
मराठवाड्यातील पहिले गोल्फ मैदान ३१ एकर जागेत साकारण्यात आले असून, या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान ‘एमजीएम गोल्फ लीग’ आयोजित करण्यात येत आहे. या प्रीमियर लीगमध्ये देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार असून, महान धावपटू मिलखासिंग यांचा मुलगा जीव मिल्खासिंग यांची प्रमुख उपस्थिती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पडेगाव येथे २०१३ पासून ३१ एकर जागेत हे गोल्फ मैदान साकारण्यात आले आहे. शहरात असलेल्या दोन गोल्फ कोर्सेसपैकी एक पडेगावमध्ये ‘एमजीएम’ने उभा केला आहे.
‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी शहराची प्रगती आणि भविष्यातील गरजांवर लक्ष वेधले.
पुण्यात ११ तर बडोद्यात सहा गोल्फ कोर्सेस आहेत. त्यामुळे शहरात गोल्फसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांची गरज भविष्यात वाढणार आहे.