Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore Controversy: महिलेला विवस्त्र फोटो पाठवले की नाही? जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2025 | 01:06 PM
Jaykumar Gore Controversy:  महिलेला विवस्त्र फोटो पाठवले की नाही? जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंगळवारी (4 मार्च) धनंजय मुंडेनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच महायुतीचे आणखी एक मंत्री जयकुमार गोरेंवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.  शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Jaykumar Gore : महायुतीचा आणखी एक नेता आला गोत्यात! पैलवान मंत्र्याने महिलेला पाठवला विवस्त्र फोटो

खासदार राऊतांच्या आरोपांनंतर जयकुमार गोरे यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 2017 साली माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात माझ्यावर   एक गुन्हा दाखल झाला होता.  2019 न्यायालयाचा निकाल आला. माझी निर्दोष मुक्तता करण्यात आली.मी असे कोणतेही फोटो पाठवले नाही.  तसेच, जप्त मुद्देमाल आणि  इतर गोष्टीही नष्ट कऱण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या घटनेला सहा वर्षे झाली. सहा वर्षांनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला . किमान आपण कुठल्या वेळी हा विषय बोलावा आणि कुठल्या वेळी काय समोर आणावं हे विरोधकांनीही याची विरोधकांनीही मर्यादा ठेवली पाहिजे. विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. राजकारणात अनेक गोष्टी असतात. पण मी जबाबदारपणे काम करतो.  मी एवढचं सांगतो की या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. त्या सर्वांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहे.

Abu Azmi Suspension : अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन, औरंगजेब उदात्तीकरण प्रकरण भोवलं

तसेच, माझ्यावर आरोप करणाऱ्यावर मी अब्रुनुकसानीचाही खटला दाखल करणार आहे. या प्रकरणावर जी कारवाई करणे गरजेचे आहे ती सर्व कारवाई मी करणार आहे. जयकुमार गोरेंनी महिलेला त्रास दिला की नाही दिला, यासंदर्भात पोलिसांनीच चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. जे कोणी माझ्याविरोधात कट रचत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी.

Web Title: Jayakumar gores response to the allegations of sanjay raut and vijay wadettiwar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • BJP MLA Jaykumar Gore

संबंधित बातम्या

Jaykumar Gore | Solapur News : ”कुठल्याही परिस्थितीत झालेली घटना कशामुळे झाली हे लपवयाच नाही”.
1

Jaykumar Gore | Solapur News : ”कुठल्याही परिस्थितीत झालेली घटना कशामुळे झाली हे लपवयाच नाही”.

Jaykumar Gore : गोरेंनी राजकीय बळाचा वापर केला, महिलेचे वकील | Satara
2

Jaykumar Gore : गोरेंनी राजकीय बळाचा वापर केला, महिलेचे वकील | Satara

Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक
3

Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.