Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Jaykumar Gore Diwali Celebration : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगार कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी कामगार माता-भगिनींना भाऊबीज दिली, तर चिमुकल्यांना नवीन कपड्यांची भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 09, 2026 | 08:43 PM
Jaykumar Gore Diwali Celebration ( जयकुमार गोरे दिवाळी उत्सव )

Jaykumar Gore Diwali Celebration ( जयकुमार गोरे दिवाळी उत्सव )

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोड कामगारांसोबत लुटला दिवाळीचा आनंद 
  • ऊसतोड कामगार माता-भगिनींना भाऊबीज 
  • शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांना आधार 
Jaykumar Gore Diwali Celebration :  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोनके (ता. पंढरपूर) येथे ऊसतोड कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या कष्टमय जीवनात आनंदाचे क्षण फुलवले. दिवाळीच्या झगमगाटापासून दूर राहून उदरनिर्वाहासाठी ऊसाच्या फडात राबणाऱ्या कष्टकरी कुटुंबांची आस्थेने विचारपूस करत त्यांनी कामगार माता-भगिनींना भाऊबीज दिली, तर चिमुकल्यांना नवीन कपड्यांची भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

याप्रसंगी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, चेतनसिंह केदार सावंत, उल्हास धायगुडे, बाळासाहेब एरंडे, माऊली हळणवर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांसोबत लुटला दिवाळीचा आनंद

राज्यात एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांसमोर अनेक संकटे उभी आहेत. अशा परिस्थितीत कष्टकरी कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा आणि समाज त्यांच्या पाठीशी आहे, ही भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला.

Pandharpur News: पंढरपूरच्या सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट! प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर, ५६ कोटींचा निधी मंजूर

ऊसतोड कामगार माता-भगिनींना भाऊबीज

यावेळी पालकमंत्री गोरेंनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि रोजच्या जगण्यातील संघर्ष जाणून घेतला. ऊसतोड कामगार माता-भगिनींना भाऊबीज देऊन आपुलकीची भावना व्यक्त केली, तर त्यांच्या चिमुकल्यांना नवीन कपडे देण्यात आले. सणासुदीच्या काळात मिळालेल्या या भेटींमुळे कामगार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांना आधार

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फराळ आणि उत्सव नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचविण्याचा सण आहे. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांना आधार देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही या कार्यात पुढाकार घेऊन गरजूंच्या मदतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Web Title: Jaykumar gore diwali celebration with sugarcane workers pandharpur sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • BJP MLA Jaykumar Gore
  • Crisis on farmers
  • Crop damage
  • Diwali 2026
  • drought news
  • Jaykumar Gore
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस
1

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
2

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
3

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
4

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.