Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 03:30 PM
वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Follow Us
Follow Us:
  • वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम
  • भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
  • निवडणुकीचा निकाल वाचा सविस्तर
ईश्वरपूर/विनोद मोहिते : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. महायुतीच्या नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा फटका बसला आहे.

 

जयंत पाटील यांचे प्रमुख विरोधक व भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना त्याच्या होम ग्राऊंड असलेल्या पेठ व येलूर या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या वहिनी हर्षदा राहुल महाडिक यांचा येलूर जिल्हा परिषद गटात पराभव केला. त्यामुळे भाजपच्या गोटात मोठी निराशा पसरली आहे. जिल्हा परिषदेच्या अवघ्या एका जागेवर व पंचायत समितीच्या ४ जागेवर भाजपाला यश मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे सहाच्या -सहा पदाधिकारी निवडणुकीत पराभूत झाले. ते वेगवेगळी चिन्हे घेवून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. याच निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांना मात्र दिलासा मिळाला. त्यांची सून मोहिनी खोत यांनी अवघ्या १३० मतांनी विजय नोंदवत यश संपादन केले.

जयंत पाटील यांनी स्वतः निवडणुकीत लक्ष घालून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही ठिकाणी यश मिळवण्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जिल्हा परिषदेत ११ पैकी ८ जागी वर्चस्व राखले. त्यात आपला सहकारी पक्ष उबाठा शिवसेना गटाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विजय मिळवला. तर पंचायत समितीत २२ पैकी तब्बल १४ जागांवर त्यांनी विजयी मिळवला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व करणाऱ्या गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ४ जागेवर पंचायत समितीमध्ये व एका जिल्हा परिषदेच्या जागेवर विजय मिळवला. अवघ्या २० ते १०० मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ३ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

संपूर्ण निवडणूक काळात जयंत पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून गावोगावी दौरे, सभा, बैठका घेत थेट मतदारांशी संवाद साधला होता. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासकामांचा लेखाजोखा मांडत भविष्यातील स्पष्ट दृष्टीकोन जनतेसमोर ठेवला होता. यामुळेच मतदारांनी मोठ्या विश्वासाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात भरघोस मतदान केले.

निकाल जाहीर होताच तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी जयंत पाटील यांचे फोटो हातात घेत जल्लोष करण्यात आला. या घवघवीत यशामुळे वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व अधिक बळकट झाले. त्यांनी विरोधकांचा मात्र करेक्ट कार्यक्रम केला. या निकालामुळे वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचे राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले. आगामी राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना

वाळवा तालुका बलाबल

जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेस – ( श.प ) ७
शिवसेना उबाठा -१

भाजप – १
शिवसेना (एकनाथ शिंदे) -१
रयत क्रांती पक्ष – १

वाळवा पंचायत समितीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -१४
भाजप – ४
शिवसेना (शिंदे गट) -४

Web Title: Jayant patil has achieved great success in the zilla parishad and panchayat samiti elections in valva taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Election Result
  • Jayant Patil News
  • MP Sharad pawar

संबंधित बातम्या

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
1

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.