Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी पवार कुटुंबाची बोलवली तातडीची बैठक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी १०:३० च्या सुमारास दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक गोविंद बागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या वैद्यकीय तपासणीनंतर शरद पवार यांना खोकला आणि कफामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले. प्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स आणि वैद्यकीय पथकाच्या निगराणीत त्यांना घेऊन सुप्रिया सुळे पुण्याच्या दिशेने निघाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३० मिनिटांत शरद पवार रूबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचणार असून तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रूबी हॉल क्लिनिकचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सायमन ग्रँट हे शरद पवार यांच्यावर उपचार करणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अपडेटची प्रतीक्षा आहे.






