'मुंबई इन मिनिट्स' संकल्पना; नवीन प्रकल्पाची आखणी
मुंबई : मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. सध्या मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच वाहतुकीची समस्यादेखील समोर उभी असते. अशातच मुंबईकरांचा प्रवास सोप्पा आणि जलद करण्यासाठी प्रशासनाने एका नवीन प्रकल्पाची आखणी केली आहे. ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
मुंबई शहराच्या कोणत्याही एका ठिकाणाहून एका तासापेक्षा कमी कालावधीत इतर कोणत्याही ठिकाणी सुलभ प्रवास करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विद्यमान सुविधांसह नवीन आणि आगामी प्रकल्प एकत्रितपणे ही संकल्पना साकार करतील. मुंबई महापालिका, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए हे एकत्रितपणे हा प्रकल्प विकसित करणार आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
‘मुंबई इन मिनिट्स’ या प्रकल्पामुळं मुंबई शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास एक तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, अशी संपल्पना राबवण्याचा उद्देश आहे. या योजनेसाठी ५८,००० कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर या प्रकल्पासाठी ९० किमीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, पूल, बोगदा बांधण्यात येणार आहे.
कमी होणार वाहतुकीची समस्या
मुंबईसोबतच गुजरातच्या सीमा, दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरामात पोहोचता येणार आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ते, पुल, बोगद्याच्या माध्यमातून वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. येत्या पाच वर्षात वाहतूकीची समस्या कमी होणार आहे.
मुंबई के ठाणे रिंग रुट तयार होणार?
सध्याच्या सुविधांव्यतिरिक्त एमएस आरडीसीद्वारे वर्सोवा-वांद्रे सागरी मार्ग आणि विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर बांधले जात असून वर्सोवा- दहिसर लिंक रोड, दहिसर-भाईंदर लिंक रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हे प्रकल्प मुंबई महापालिकेकडून राबवले जात आहेत. तर, ऑरेंज गेट टनल, शिवळी वरळी कनेक्टर, ठाणे-बोरीवली टनल, गायमुख-भाईंदर टनल आणि उन्नत मार्ग, ठाणे कोस्टल रोड, ठाणे खाडीवर ठाण ती भिवंडीला जोडणारे तीन खाडी पूल, आनंदनगर-साकेत उन्नत रोड आणि घाटकोपर ते आनंदनगर, ठाणेपर्यंत पूर्व मूक्त मार्गाचा विस्तार यासारखे प्रकल्प एमएमआरडीतर्फे राबवले जात आहेत. यामुळे मुंबई आणि ठाणे येथे रिंग रुट तयार होत आहे.