Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त

पुणे - अहिल्यानगर महामार्गावर दिवसेंदिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 05:08 PM
पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त

पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Follow Us
Follow Us:
  • पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी
  • प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त
  • विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतोय मनस्ताप
रांजणगाव गणपती/पोपट पाचंगे : पुणे – अहिल्यानगर महामार्गावर दिवसेंदिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, रोजच्या वाहतूककोंडी समस्येमुळे मानसिक त्रास सहन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. या महामार्गावर झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि अपुरे रस्ते व्यवस्था यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

 

औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. मात्र त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग किंवा ट्रॅफिक नियोजन करण्यात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या वेळी मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. एमआयडीसीतील कंपन्यात कामावर जाण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग हे कामावर जाणाऱ्या नागरिकांना दररोज घरातून लवकर निघावे लागत असून, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनांवर हा महत्वपूर्ण प्रश्न अडकून राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कागदोपत्री निर्णय होत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

औद्योगिक विकासावर परिणाम

वाढत्या वाहतुकीच्या वाढत्या समस्येमुळे औद्योगिक विकासावरही परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात नवीन उद्योग येण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान उद्योग स्थलांतरित झाल्यास स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, फेरीवाले व छोट्या दुकानदारांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन, रस्त्यांचे रुंदीकरण व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • शिरुर ते शिक्रापूर या मुख्य रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण
  • अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची निर्मिती
  • ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती
  • औद्योगिक वसाहतीसाठी पर्यायी बायपास रस्ता
  • सिग्नल व्यवस्था व वाहतूक नियोजन त्वरित लागू करणे

Web Title: Traffic jams are happening daily on the pune ahilyanagar highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune Traffic Police
  • Road Traffic

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
4

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.