मेढा : मेढा गांवचे कैकाडी समाजातील सुपुत्र वैभव आप्पासाहेब जाधव याची राज्यकर निरीक्षकपदी (एसटीआय)| निवड झाली असून त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विमुक्त जाती मधून राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तिसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
वैभव जाधव याचे ७ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा मेढा येथे झाले असून तत्कालीन प्राथमिक शिक्षीका लक्ष्मी गोळे व संजीवनी मुळे यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकण्याचे यशस्वी मागर्दर्शन लाभले व तेव्हा पासूनच त्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली. प्राथमिक शाळेतच त्याचा शैक्षणिक पाया मजबूत झाला. इ. ८वी ते इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा येथे झाले .व बी. एस्सी. अॅग्री चे शिक्षण दादासाहेब मोकाशी कॉलेज कराड येथे झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ‘गुरुकुल अभ्यासिका’ सातारा येथे करीत होता. त्यास अनिल कोळी (पी.आय.) क्राईम ब्रँच यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच गुरूकुल मधील सहकारी मित्रांचेही त्यास विशेष सहकार्य लाभले.
वैभव आप्पासाहेब जाधव हा कैकाडी समाजातील असून वडील आप्पासाहेब जाधव हे महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये कृषी विभागात विस्तार अधिकारी म्हणून सेवेत आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून जाधव कुटूंबिय उभे राहीले असून वैभवचे आज्जी आजोबा आजही बांबुच्या टोपल्या, कणगी वळण्याचे काम करत आहेत.
-मेढा नगरीत जल्लोषात स्वागत व सत्कार
स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर वैभवचे मेढा नगरीत आगमन झाले तेव्हा शिवाजीनगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, मेढा ग्रामस्थ यांनी त्यांचे फटाकड्याच्या आतषबाजीत स्वागत करून सत्कार केला. यावेळी जेष्ठ नेते माजी सरपंच बबनराव वारागडे, डॉ. संपतराव कांबळे, एम.डी. जाधव, सुरेश पार्टे, सतिश मर्ढेकर, प्रकाश कदम, आर. टी. दळवी (गुरुजी), जांभळे गुरुजी, अरुण जवळ, दत्तात्रय खताळ, संजय सपकाळ, रामभाऊ सावंत, चंद्रकांत साळुंखे, पुंडलिक पार्टे, संदीप पवार, सोमनाथ साखरे, रोहित जाधव इम्रान आतार, शिवाजी शिंगटे, मोहन देशमुख, सुनिल धनावडे, फौजी महेश जाधव, अभिजीत शिंगटे, रामचंद्र जाधव, वसंत धनावडे, आजोबा सुरेश जाधव, बबलू जाधव इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
माजी उपसभापती कांतीभाई देशमुख यांच्यासह मेढा, केळघर परिसरातील सरपंच, पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत गुरव, पत्रकार सोमनाथ साखरे, भाष्कर धनावडे, विजय सपकाळ, नंदू गाडगीळ, संजय दळवी, रघुनाथ पार्टे, संदीप गाडवे, नारायण जाधव यांनी अभिनंदन केले.
-अभ्यास काळात मोबाईल बंद
-यश मिळाले तरच गांवी येणार,घेतली होती शपथ
-चिकाटी जिद्द, व अभ्यासातील सातत्य यामुळेच मिळाले यश