Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित सदस्य अस्वच्छतेच्या प्रश्नांवर चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 06:49 PM
अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका (फोटो सौजन्य-Gemini)

अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

अमरावतीत तब्बल ४ वर्षांनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा कचरा व्यवस्थापन व शहर विकासाच्या प्रश्नांवर गाजली. यावेळी नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित सदस्य अस्वच्छतेच्या प्रश्नांवर चांगलेच आक्रमक झाले होते. अवघ्या ३० मिनिटांच्या प्रश्नोत्तरांच्या कालावधीत ११ प्रश्नांच्या गदारोळाने सभागृह तापले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरांच्या कालावधीत जोरदार चचर्चा झाली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका स्वाती कुळकर्णी आणि स्वाभिमान पक्षाचे सर्वात अनुभवी तरुण नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे यांनी प्रश्नांची सुरुवात केली. शहर सुधारणा विकास योजना लागू होऊन जवळजवळ ७ वर्षे उलटली असताना, महानगरपालिका अजूनही नवीन शहर सुधारणा विकास योजना तयार करणार नाही का, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाने सभेचे अध्यक्ष महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त सौम्या शर्मा हेसुद्धा अवाक झाले.

Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

प्रा. प्रशांत वानखडे यांनी सभागृहात पहिला प्रश्न उपस्थित करताना गेल्या ७ वर्षांत महानगरपालिकेने शहर सुधारणा विकास योजना सरकारकडे सादर केली आहे का? तसेच त्यावर सरकारकडून काय प्रतिसाद मिळाला, याची सविस्तर माहिती सभागृहासमोर मांडण्याची मागणी केली. त्यानंतर शेगाव-रहाटगाव परिसरातील स्वच्छतेबाबत नगरसेवक चंदू वानखडे यांनी प्रश्न उपस्थित केला.

भाजप नगरसेविका स्वाती कुळकर्णी यांनी हा मुद्दा अधिक तीन करीत शहरातील कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर बोट ठेवले, शहर स्वच्छतेचा विषय निघताच सत्ताधारी व विरोधक एकाचवेळी महानगरपालिका प्रशासनावर आक्रमक झाले. कचरा कंत्राटदाराच्या मनमानी कारभारा बाबत आणि कामातील गंभीर त्रुटीविरोधात सर्व नगरसेवकांनी एकमुखी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहर स्वच्छतेबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभागृहातील गदारोळात कुणीही ऐकून घेतले नाही. वेळेच्या मयदिमुळे प्रश्नोत्तरांचा कालावधी संपताच महानगरपालिकेचे नाव अमरावती-बडनेरा महानगरपालिका असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेनंतर बैठक तहकूब करण्यात आली.

पुढील सर्वसाधारण सभा केवळ शहरातील कचरा प्रश्नावरच केंद्रित असेल, असे आश्वासन पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सभा पुढील तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली. २३ प्रस्ताव प्राप्त पहिल्या सर्वसाधारण सभेत ११ प्रश्नोत्तरांव्यतिरिक्त सदस्यांकडून एकूण २३ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त पहिल्या प्रस्तावावर ५ मिनिटे चर्चा होऊन तो सरकारकडे परत पाठविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

इंगोले यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

तत्पूर्वी काँग्रेसचे सर्वात अनुभवी व ७वेळा निवडून आलेले माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या निर्णयाचे सभागृहात टेबल वाजवून स्वागत करण्यात आले.

Wadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

Web Title: Ruckus over garbage at the amravati assembly first session makes a splash 11 issues raised in 30 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • amravati
  • maharashtra
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.