कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्डा प्रश्ना संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी आक्रमक भुमिका घेत पत्रकारांना कल्याणमधील विविध परिसरात फेरफटका मारीत रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवित प्रशासनाची पोल खोल केली आहे. एकीकडे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असतांना दुसरीकडे मात्र हे खड्डे बुजविण्यासाठी आणलेली मशीन मात्र धूळखात पडून असल्याची बाब उगले यांनी उघडकीस आणली आहे. प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणी उगले यांनी केली आहे.
कल्याण शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. असे असतांना कल्याण पश्चिमेतील अग्निशमनदल मुख्यालय येथे गेल्या एक महिन्यापासून मँस्टिक पध्दतीने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्याचा ठेका दिलेल्या एजन्सीने या मशीन दिखाव्यासाठी ठेवल्या आहेत का? असा सवाल उगले यांनी उपस्थित केला आहे. याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली असता शहरामधील रस्त्यावरील खड्याचे प्रमाण अंत्यत अल्प आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शहारातील रस्त्यावर खड्डे पडले नाहीत असे सांगितले.
यावर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रशासनाला सवाल केला आहे की, खड्डे अल्प प्रमाणात पडले आहेत तर खड्डे भरण्यासाठी २२ कोटी रक्कमेची तरतूद करून कामे हाती घेतली आहेत. एक महिन्यापासून शासकीय जागेत मशीन पडून आहेत. जर का मशीनने काम करणार नसतील तर २२ करोडचे काम नसेल तर उरलेल्या पैशाचे प्रशासन काय करणार आहे यांचे उत्तर प्रशासनाने द्यावे. खड्डेमय रस्ते असतांना देखील मनपा आधिकारी बिनधास्त पणे सांगतात खड्डे नाहीत, “क” प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांना देखील रस्त्यावर पडलेले खड्डे दाखविले आहेत. आधारवाडी चौकातील रिलायन्स समोरील रस्त्यावरील खड्डा, दुर्गाडी समोरील रस्त्यावरील खड्डे, पवारणीचा पाडा परिसरातील खड्डे, असे चार पाच रस्त्यावरील खड्डे दाखवून देखील जर का माणसे मेली तरच काम करणार का? असा सतंप्त सवाल उगले यांनी उपस्थित केला.
प्रशासनाने खुलासा केला पाहिजे जे पैसे शिल्लक राहणार त्यांचा विनयोग काय करणार हे जनतेला कळाले पाहिजे अशी रोख ठोक भुमिका कल्याण डोंबिवली शहारातील रस्त्यावरील खड्डे प्रश्नी माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रसिद्धी माध्यामा समोर मांडत खड्डे प्रश्ना बाबत प्रशासनाच्या उदासीन भुमिकेबाबत संताप व्यक्त केला.