Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 19, 2025 | 07:15 PM
Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत
Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याणमध्ये बिबट्याचा वावर
  • गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला
  • हल्ल्यामूळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
कल्याण : राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला. वसद येथील एका फार्महाऊस मधील गोठ्यात घुसून बिबट्याने तीन वासरांवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात भिती युक्त वातावरण पसरले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसद गाव परिसरातील एका फार्महाऊसमधील गोठ्यात शुक्रवारी पहाटे च्या सुमारास बिबट्याने शिरकाव करीत आठ दिवसीय दोन वासरे आणि एक दीड वर्षीय वासरावर हल्ला केला.

बिबट्या ने केलेल्या हल्यात तिन्ही वासरांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती कल्याण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. संदर्भीत क्षेत्रातील वनपाल राजू शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच कल्याण वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी वसत गावातील नाडर फार्महाऊसवर दाखल झाले असून पंचनामा केला आहे. तर याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था देखील वनविभागाकडुन करण्यात येत आहे.

Mumbai-Nashik Highway: प्रवाशांनो लक्ष द्या! ठाण्यातील ‘या’ मार्गांवरील वाहतूक चार महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

राज्यभरात बिबट्याचे हल्ले नागरिकांवर होत असल्याने बिबट्यांच्या या हल्ल्यामूळे कल्याणकरांची पुरती तारांबळ उडाली. दोन ते तीन दिवसांपासून हा बिबट्या या परिसरात दिसत असून याबाबत वनविभागाच्या हद्दीचा प्रश्न निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिसाद मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात दक्षता वाढवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहापूर येथील साईवेद हॉटेल समोर हायवे परिसरात काल सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वाहनाने एका बिबट्याला जोरदार धडक दिली. त्या धडकेनंतर बिबट्या काही काळ रस्त्यावर पडलेला होता. मात्र काही वेळातच तो स्वतः उठला आणि परिसरात असलेल्या परिवार हॉटेलच्या दिशेने जाताना दिसून आला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जखमी अवस्थेत असतानाही बिबट्याने हायवेच्या कडेला असलेल्या वस्तीच्या दिशेने हालचाल केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, परिवार हॉटेल परिसरातून तो पुढे सावरोली परिसराच्या दिशेने जाताना पाहण्यात आला आहे.

अपघातानंतर बिबट्या कुठे गेला याबाबत निश्चित माहिती नसली तरी तो जखमी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जखमी बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच शेतात, मोकळ्या जागेत किंवा निर्जन रस्त्यांवर एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन शहापूर उपविभागीय पोलीस कार्यालय येथून करण्यात येत आहे.
तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वनविभाग, पोलीस प्रशासन किंवा स्थानिक आपत्कालीन यंत्रणेला माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leopard Rescue : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातानंतर बिबट्याचे काय झाले?

    Ans: धडकेनंतर बिबट्या काही वेळ रस्त्यावर पडून होता, मात्र नंतर तो उठून परिवार हॉटेलच्या दिशेने व सावरोली परिसराकडे जाताना दिसला.

  • Que: बिबट्या जखमी असल्याची शक्यता आहे का?

    Ans: अपघात झाल्याने तो जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि जखमी बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो.

  • Que: नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

    Ans: रात्री अनावश्यक बाहेर पडू नये निर्जन रस्ते, शेतात किंवा मोकळ्या जागेत एकटे जाऊ नये लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी

Web Title: Kalyan news three calves attacked after entering cowshed leopard terror in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • kalyan news
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Leopard Rescue : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी
1

Leopard Rescue : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी

Leopard Attack : पुण्यात बिबट्याची दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
2

Leopard Attack : पुण्यात बिबट्याची दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना
3

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर
4

Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.