Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

अहिल्यानगरच्या खडकी गावात बिबट्यांचे वारंवार दर्शन पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गावकऱ्यांकडून महावितरणला देखील एक निवेदन देण्यात आले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 08:27 PM
बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत!

बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत!

Follow Us
Close
Follow Us:
  • खडकीत बिबट्यांचा वावर
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • दिवस वीज पुरवठा करण्याचे महावितरणला निवेदन
अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर खडकी ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणकडे निवेदन देऊन शेतीसाठी दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खडकीचे सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी सोमवारी (दि. २) ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खडकी गावात तसेच परिसरात बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. प्रशांत नारायण कोठुळे यांच्या घरामागील भागात रावसाहेब कोठुळे यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी जयसिंग रामचंद्र कोठुळे यांच्या घरासमोरही कुटुंबीयांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले आहे.

Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी बिबट्याप्रवण भागात दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या अनेक भागांत पुन्हा रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. परिणामी, रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

पाण्याची गरज, मात्र भीतीचे वातावरण

रब्बी हंगामातील सर्वच पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती पसरली असून, जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करणे अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली

दुर्घटना घडल्यानंतरच निर्णय होणार का?

खारेकर्जुने येथे चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आणि निंबळक परिसरात बालकावर बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या तालुक्यातील बहुतांश भागात पुन्हा रात्रीचाच वीजपुरवठा सुरू आहे.

“दुर्घटना घडल्यानंतरच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार का?” असा संतप्त सवाल सरपंच भाऊसाहेब बहिरट यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महावितरण कंपनी कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा रोष खडकी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Ahilyanagar news leopard frequently seen in khadki village mahavitaran to supply electricity during the day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
2

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
3

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर
4

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.