Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश

शिराळा येथील बिउरमध्ये सहा वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बळी घेतल्यानंतर वन विभाग नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 06:30 PM
Man eating leopard in Shirala Biur captured by the forest department and rescue team sangali news

Man eating leopard in Shirala Biur captured by the forest department and rescue team sangali news

Follow Us
Follow Us:

Sangli News : शिराळा : गेल्या काही महिन्यापासून शिराळा तालुक्यात (Sangli News) धुमाकूळ घालून अनेक जीवांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात आले आहे. सदर बिबट्यास वनविभागामार्फत पुणे येथील निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे अशी माहिती वनविभागाकडून (Forest Department) देण्यात आली आहे.

बिउर ता. शिराळा येथील सहा वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बळी घेतल्यानंतर परिसरात व तालुक्यात वन विभागा विरोधात राजकीय सामाजिक क्षेत्रातून मोठे राण उठले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जनमानसात वनविभागा विरोधात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होऊ लागली होती. जनक्षोभ अनावर झाल्याने वनविभागाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन या विभागात बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व ट्रॅप पिंजरे लावले होते. त्याचबरोबर विशेष डॉग स्कॉड पथक मागवण्यात आले होते. वनविभागाचे कर्मचारी अधिकारी याकरता सक्रिय झाले होते. अखेर बिबट्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात सापडला झाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुणे येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.

हे देखील वाचा : वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा

३० जानेवारी रोजी मौजे बिऊर, अमृतनगर येथे वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील वय वर्ष ५ याचा दुदैवी मृत्यु झाला होता. सदर घटनेच्या अनुषंगाने मौजे बिऊर येथे घटनास्थळी बिबट या वन्यप्राण्याला पकडण्याकरीता लोखंडी सापळा लावण्यात आला होता. स्थानिक, वनअधिकारी व कर्मचारी व सहयाद्री रेस्कयु वॉरियर्सचे संस्थापक प्रा. सुशीलकुमार गायकवाड व टीम तसेच कोल्हापूर व पुणे RRT टीम व श्वानपथक पुणे यांनी दिवसा व रात्री अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट या वन्यप्राण्याचा मागोवा घेतला. 4 फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेल्या त्याच लोखंडी सापळयात बिबट वन्यप्राणी अडकला असून त्याला सांगली येथे उपवनसंरक्षक कार्यालय येथे आणुन पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली असता तो सुस्थितीत असल्याने त्याला पुणे येथील बिबट निवारण केद्रामध्ये पाठविण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :  संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात

सदरची कार्यवाही जी. गुरूप्रसाद, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर, सागर गवते, उपवनसंरक्षक (प्रा.) सांगली, नवनाथ कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (वनी.) सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास उपवनसंरक्षक (प्रा.) सांगली यांचे कार्यालयाचे आवारामध्ये आणुन त्याची पशुवैद्यकिय यांचे मार्फत तपासणी करून तो सुस्थितीत असल्याने त्यास पुणे येथील बिबट निवारण केद्रामध्ये पाठविण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही रमेश कांबळे, वनक्षेत्रपाल (प्रा.) शिराळा अति. कार्यभार, सौ. शामला खोत, तहसिलदार शिराळा, अनिल वाजे, वनपाल बिळाशी, दत्तात्रय शिंदे, वनरक्षक बिऊर, रजनिकांत दरेकर, वनरक्षक बिळाशी,. जंबाजी भोसले, पोलीस निरीक्षक शिराळा,वरूटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिराळा, उदय पाटील पोलीस उपनिरीक्षक शिराळा, कुंभार, हवालदार. मांगले, पोलीस शिपाई, धीरज गायकवाड, पंकज कदम मिलिंद गायकवाड, प्राणीमित्र, संपत देसाई, कायम वनमजुर, संतोष कदम, सचिन पाटील, हर्षल जाधव, नामदेव सीद, राहुल पाटील, संजय पाटील यांनी केली. सापळ्यामध्ये सापडलेला सदरचा बिबट्या नरभक्षक असून त्याला त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात न सोडता पुणे येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.

Web Title: Man eating leopard in shirala biur captured by the forest department and rescue team sangali news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard Attack
  • Sangali News

संबंधित बातम्या

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
1

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.