Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोड रोमिओंची ‘वरात’ पोलीस ठाण्याच्या ‘दारात’; अश्लिल शेरेबाजी करणाऱ्यांना निर्भया पथकाने धडा शिकवला

बदलापूर तेथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कराड पोलिसांनी महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कराड जवळच्या ओगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओंना कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व निर्भया पथक यांनी चांगलाच धडा शिकवला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 26, 2024 | 04:59 PM
रोड रोमिओंची ‘वरात’ पोलीस ठाण्याच्या ‘दारात’; अश्लिल शेरेबाजी करणाऱ्यांना निर्भया पथकाने धडा शिकवला
Follow Us
Close
Follow Us:

कराड :कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळच्या ओगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओंना कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व निर्भया पथक यांनी चांगलाच धडा शिकवला. उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत तेथील टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शैक्षणिक वर्तुळातून व कराड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.

बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्रच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा पोलीस दलाला जिल्ह्यातील मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. महिला अत्याचाराच्या घटना, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व व निर्भया पथकाने कराड परिसरात कारवाईचा ‘ॲक्शन प्लॅन’ सुरू केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी ओगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात छेडछाड व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोडरोमियोंना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई केली. निर्भया पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यासह स्वतः पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. पोलिसांच्या अचानक कारवाईने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. ही कारवाई करून या परिसरातील रोड रोमिओंना पोलिसांनी चांगलाच दणका दिला.

कॅफे चालकावर कारवाई

या कारवाई दरम्यान ओगलेवाडी परिसरातील एका कॅफेची तपासणी करून नियमबाह्य बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कॅफे चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर देखील कारवाई केली. या कारवाईने या परिसरातील हॉटेल व लॉज व्यावसायिक, कॅफे चालक त्यांचे धाबे दणाणले आहेत.

साध्या वेशातील पोलिसांची गस्त

कराडमधील विद्यानगर, सैदापूर, मलकापूर येथे शैक्षणिक संकुले आहेत.‌ या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात फाळकुट दादांची सतत अरेरावी सुरू असते. शिक्षणासाठी बाहेरगावहून येणाऱ्या मुला-मुलींना धमकवण्याच्या घटना घडतात. अश्लिल शेरेबाजी करणाऱ्यांची आणि मुलींच्या जवळून भरधाव दुचाकी चालवत ‘हवा’ करणाऱ्या रोड रोमिओंची ‘हवा’ काढण्याचे नियोजन पोलिसांनी केली आहे. त्यासाठी आता कराड परिसरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कचाट्यात सापडल्यास रोड रोमिओंना पोलिसी खाक्या बघायला मिळणार आहेत.

छेडछाड करणाऱ्यांची गय करणार नाही

शाळा व कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे. शालेय मुली व महिलांनी त्यांना कोणाचा त्रास होत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवावे. पालकांच्या मार्फतही पोलिसांना कळवता येईल. अशी कोणतीही तक्रार आल्यास पोलीस कोणाचाही मुलाहिजा न ठेवता तात्काळ कारवाई करतील, असा इशारा उपाधीक्षक ठाकूर यांनी दिला आहे.

Web Title: Karad news nirbhaya team taught a lesson to road romeos for making obscene remarks nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Karad news

संबंधित बातम्या

Jaykumar Gore News:  कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर
1

Jaykumar Gore News: कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर

कराडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले
2

कराडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा
3

उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा

कराडच्या शनिवार पेठेतील दुकानाला भीषण आग; 20 लाखांचे साहित्य जळून खाक
4

कराडच्या शनिवार पेठेतील दुकानाला भीषण आग; 20 लाखांचे साहित्य जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.