Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat – Jamkhed News : खड्ड्यांचा त्रास संपणार? कर्जत-जामखेडसाठी २० कोटींचा निधी मंजूर! राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

Karjat - Jamkhed News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्या रस्त्यासाठी किती निधी मिळाला? जाणून घ्या सविस्तर...

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 09:37 PM
Ram Shinde

Ram Shinde

Follow Us
Follow Us:
  • कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर
  • प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश; चार रस्त्यांना मिळणार निधी
  • शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना होणार फायदा
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर : कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत रस्ते व दळणवळणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, दुरुस्ती, खड्डेमुक्ती आणि सुधारणांसाठी एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (Karjat – Jamkhed News)

या निधीमुळे मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या मार्गांचे चित्र बदलणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गावांना बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा आणि प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांची सद्यस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांची सकारात्मक दखल घेत संबंधित रस्ते विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

चार महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना निधी –

मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

१. जामखेड – खर्डा – भूम रस्ता : १० कोटी रुपये

या महत्त्वाच्या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून, परिसरातील वाहतुकीला मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

२. घोगरगाव – कोंभळी – वालवड – कर्जत रस्ता : १ कोटी २० लाख रुपये

या मार्गावरील दुरुस्ती, खड्डेमुक्ती आणि आवश्यक रस्ता सुधारणा करण्यात येणार असून, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

३. राहाता – लोहारे – मांडवा – पारनेर – बेलवंडी – श्रीगोंदा – हिरडगाव – कुळधरण – कर्जत – करमाळा रस्ता : ६ कोटी ८० लाख रुपये

या महत्त्वाच्या मार्गाच्या सुधारणांमुळे विविध गावांमधील संपर्क आणि दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

४. अमरापूर – पाथर्डी – माणिकदौंडी – कडा – मिरजगाव – कर्जत – राशिन – बारामती रस्ता (डिकसळ ते चिंचोली फाटा) : २ कोटी रुपये

या मार्गावरील डिकसळ ते चिंचोली फाटा या टप्प्याच्या रस्ता सुधारणेसाठी निधी उपलब्ध झाला असून, या परिसरातील वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

विकासाचा ध्यास, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

रस्ते हे केवळ एका गावाला दुसऱ्या गावाशी जोडणारे माध्यम नसून, ते त्या भागाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचे महत्त्वपूर्ण साधन असतात. चांगले रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची सुविधा, विद्यार्थ्यांचा सुलभ प्रवास, रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा आणि व्यापारी-उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी होय.

हीच विकासाची व्यापक संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शासनाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेणे आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे यासाठी त्यांचा असलेला सक्रिय पाठपुरावा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

२० कोटी रुपयांच्या या निधीमुळे कर्जत-जामखेडच्या रस्ते विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे. आगामी काळात या कामांची दर्जेदार आणि वेळेत अंमलबजावणी झाल्यास मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील.

जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास, पायाभूत सुविधांना बळ देणारे निर्णय आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न, हीच प्रा. राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळालेले हे यश कर्जत-जामखेडच्या विकासप्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Solapur News : सोलापूरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी १० कोटींचे निवारा केंद्र! १ हजार कुत्र्यांना मिळणार आसरा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्जत-जामखेडच्या रस्ते विकासासाठी किती निधी मंजूर झाला?

    Ans: कर्जत-जामखेड मतदारसंघातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

  • Que: जामखेड-खर्डा-भूम रस्त्यासाठी किती निधी मिळाला?

    Ans: जामखेड-खर्डा-भूम रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

  • Que: कर्जत-जामखेडमधील रस्ते विकासासाठी कोणी पाठपुरावा केला?

    Ans: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर २० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Karjat jamkhed news ram shinde road development 20 crore fund approved vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • ram shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.