कर्जत/संतोष पेरणे : हाताोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावला, आता न्याय मागायचा तरी कुणाकडं? असा प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे. राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालं. मराठवाडा विदर्भ राज्यातील विविध कानाकोपऱ्यातील शेतकरी हवालदीन झाला आहे. याला अपवाद कर्जतमधील शेतकरी देखील राहिले नाही.
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 9 0 टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानी मुले शेतीतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे.
तालुक्यातील 6 मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं नाही. परंतु ज्यांनी बियाणं पेरलं आहे त्यांचे मात्र शंभर टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान कर्जत तहसीलदार यांच्याकडून महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेऊन उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे.भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी कर्जत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी केला आहे.
कर्जत तहसीलदार यांच्याकडून भाताच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. त्यासाठी आज कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातील कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली. त्या बैठकीत भात ओईकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी गावपातळीवर टीम तयार करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार यांच्याकडून देण्यात आली. गाव पातळीवर तलाठी,ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहायक या तिघांची टीम पंचनामे शेतात जाऊन करणार आहेत.
अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे सरकारने याकडे लक्ष देऊन सरसकट पंचनामे करावे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे, असं पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे.
दरवर्षी आमच्या शेतीचे असे नुकसान होत असतात सरकार कर्जत तालुक्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठली भरपाई मिळाली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यावर्षी सरकारला विनंती तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी तहसीलदारांनी महसूल खात्याला आदेश देऊन पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे, असं मोरेश्वर जाधव या शेतकऱ्याने सांगितलं आहे.