Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळाली नाही आणि आर्थिक व्यवहार होत असल्याने महत्वाचे अशा सरकारी कार्यालयाला भाड्याचे जागेचा सहारा घ्यावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 06:23 PM
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
Follow Us
Close
Follow Us:
  • जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट
  • सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यात जमिनीची खरेदी विक्री करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.त्यामुळे कर्जत येथे असलेली दुय्यम निबंधक यांचे दुसरे कार्यालय नेरळ येथे सुरू करण्यात आले.आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळाली नाही आणि आर्थिक व्यवहार होत असल्याने महत्वाचे अशा सरकारी कार्यालयाला भाड्याचे जागेचा सहारा घ्यावा लागत आहे. दरम्यान,एका भाड्याच्या जागेतून दुसऱ्या भाड्याच्या जागेत हे कार्यालय हलवले असून पूर्वी रस्त्याच्या अगदी बाजूला असलेले कार्यालय आता आडबाजूला नेण्यात आले आहे.त्यामुळे लोकांची गैरसोय होणार असून येथील दुय्यम निबंधक यांची मनमानी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीचे पेव मागील 25वर्षात कायम आहेत. आता राहिलेले उरल्या सुरल्या जमिनीची विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत.त्यामुळे कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयाला तालुक्यात दोन कार्यालये बनवावी लागली आहेत.त्यातील नेरळ येथील कार्यालयात परवानगी नसलेल्या भूखंडांचे व्यवहार होत असतांत आणि त्यामुळे नेरळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय सतत गजबजलेले असते.हे कार्यालय गेली काही वर्षे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या अगदी बाजूला सन्मान हॉटेल मधील पहिल्या मजल्यावर भाड्याच्या जागेत सुरू होते.गेली काही वर्षे ही कार्यालय तेथे असून नेरळ गावात महसूल विभागाचे अनेक भूखंड असून तेथे आर्थिक व्यवहार होणारे कार्यालय असायला हवे होते.मात्र गेल्या सात आठ वर्षात त्या ठिकाणी कार्यालय हलविण्याची कोणतेही तसदी येथे दुय्यम निबंधक म्हणून येणाऱ्या अधिकारी वर्गाने दाखवली नाही.

पूर्वीच्या कार्यालयाच्या काही अंतरावर नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे,तेथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे,मात्र येथे देखील सरकारी जागेत कार्यालय हलवले गेले नाही.तर नेरळ गावात नेरळ विकास संकुल प्राधिकरणाचे तीन मजल्याचे व्यापारी संकुल आहे.तेथे प्राधिकरण तांत्रिक अधिकारी यांचे कार्यालय आहे,मात्र दुय्यम निबंधक कार्यालय मात्र भाड्याच्या जागेत का?हा प्रकार कोणालाही समजू शकला नाही.सन्मान हॉटेल मध्ये हे कार्यालय अनेक वर्षे सुरू होते,त्या कार्यालयाच्या तळमजल्यावर मद्य विक्रीचा व्यवसाय असताना देखील सह निबंधक कार्यालय सुरू असल्याचं आश्चर्य व्यक्त होत होते.

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

आता कर्जत दुय्यम निबंधक 2 या कार्यालयाचे स्थलांतरण करण्यात आले आहे.नवीन जागेत हे कार्यालय हलवले आहे,मात्र नवीन जागा ही देखील भाड्याची जागा आहे.परंतु नवीन जागेत दुय्यम निबंधक कार्यालय हलवले जात असताना ते अनेकांना गैरसोयीचे ठरणार आहे.कर्जत 2 दुय्यम निबंधक कार्यालयाचा पत्ता हा कोणत्याही मुख्य रस्त्यावरील नाही.त्यामुळे नवीन जागेत हलवण्यात आलेले सह निबंधक कार्यालय शोधण्यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता ते कार्यालय सुरक्षित ठिकाणी असणे आवश्यक असते, मात्र कर्जत 2 दुय्यम निबंधक कार्यालय हे सरकारी अधिकाऱ्यांना खासगी मालमत्ता वाटते काय? असा प्रश्न पडतो.

व्हि जी आंब्रजकर.. दुय्यम निबंधक
आम्हाला सरकारच्या गाईड लाईन्स आल्या असून त्यानुसार जुन्या इमारती मध्ये भाड्याने कार्यालय घेतले असल्यास त्याचे भाडे पुढे इमारत जशी जुनी होईल तसे भाडे कमी व्हायला हवे अशा सूचना आहेत.जुन्या ठिकाणी भाडे हे 33 हजार प्रति महिना होते तर नवीन ठिकाणी घेतलेल्या जागेचे भाडे 24 हजार एवढे असणार आहे.आम्ही शासनाची जमीन शोधत असून जागा सापडल्या सरकारी जागेत कार्यालय उभे करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

अधिकाऱ्यांची टाळाटाळ
1गल्ली मध्ये कार्यालय का हलवण्यात आले आहे याचे उत्तर दुय्यम निबंधक यांनी दिले नाही.
2आर्थिक व्यवहार करणारे कार्यालय असल्याने आडबाजूला कार्यालय गेल्या लोकांची गैरसोय होईल या प्रश्नांवर देखील दुय्यम निबंधक यांनी उत्तर दिले नाही.
3संबंधित प्रश्न आपले म्हणणे कॅमेरे समोर मांडण्याबाबत विचारले असता कॅमेरे समोर बाईट देण्याचा आपल्याला अधिकार नसून वरिष्ठ याबाबत बाईट देऊ शकतात असे उत्तर देत आपली जबाबदारी टाळण्याचे काम दुय्यम निबंधक करताना दिसत आहेत.

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

 

Web Title: Karjat news land purchase and sale chaos unable to get space for government offices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
1

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
2

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप;  सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त
3

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप; सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
4

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.