Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : आगळ्या वेगळ्या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना फवारणी यंत्र आणि गांडुळ खताचे वाटप 

डोंगरपाडा येथे युनायटेड वे मुंबई कार्यान्वयित जल संजीवनी प्रकल्पांतर्गत रोपवाटिका व्यवसायाचा आणि उभी परसबाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 01:33 PM
Karjat News : आगळ्या वेगळ्या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना फवारणी यंत्र आणि गांडुळ खताचे वाटप 
Follow Us
Follow Us:
  • आगळ्या वेगळ्या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ
  • शेतकऱ्यांना फवारणी यंत्र आणि गांडुळ खताचे वाटप
कर्जत/संतोष पेरणे : डोंगरपाडा येथे युनायटेड वे मुंबई कार्यान्वयित जल संजीवनी प्रकल्पांतर्गत रोपवाटिका व्यवसायाचा आणि उभी परसबाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना गांडुळ खत किट,फवारणी पंप यांचे वाटप करण्यात आले.तसेच घरगुती भाजीपाला तयार करण्यासाठी किचन गार्डन संकल्पना राबविण्यात सुरुवात झाली आहे.
युनायटेड वे मुंबई, अंधेरी (प.) संस्थेद्वारे कार्यान्वयित ‘जल संजीवनी’ प्रकल्प कर्जत तालुक्यात मृदा व जलसंधारण, ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून, पाथरज ग्रामपंचायतीमधील डोंगरपाडा येथे गावकऱ्यांना विशेषतः महिलांना पोषणयुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘उभी परसबाग’ (व्हर्टिकल किचन गार्डन) आणि महिला सक्षमीकरणासाठी ‘रोपवाटिका’ व्यवसायाचे औपचारिक उद्घाटन डोंगरपाडा गावात करण्यात आले.यावेळी कृषी पर्यवेक्षक अनिल रूपनवर,भाणवसे,जिल्हा परिषद शाळेचे स्वाती अवरगंडे, युनायटेड वे या संस्थेचे मंगेश बोपचे आदी उपस्थित होते.कमी पाणी आणि कमी श्रमात घराच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवता यावा, या उद्देशाने डोंगरपाडा गावातील २७ महिला बचत गट सदस्य असणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमात प्राधान्य देण्यात आले आहे. या कुटुंबांना निम पेंड, ट्रायकोडर्मा, उसाची मळी यांसारखी सेंद्रिय खते तसेच विविध भाजीपाल्यांचे बियाणे किट आणि रोपे वितरित करण्यात आली होती.या कार्यक्रमात सध्या या भाजीपाल्याची उगवण उत्तम झाली असून या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे महिलांना घरच्या घरी सकस आहार उपलब्ध होणार आहे.या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल
 त्यावेळी खांडस बचत गटाच्या अरुणा ऐनकर यांनी आपल्या गटाची भरभराट कशी झाली याबद्दल माहिती दिली. डोंगरपाडाचे माजी उप सरपंच अतुल लोहकरे यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या मृदा आणि जलसंधारण कार्य आणि शेतीविषयक राबविलेले उपक्रमबद्दल माहिती दिली.राजेश्री तिटकरे यांनी उपक्रम निवड आणि पुढील वाटचाल बद्दल थोडक्यात सांगितले, तुंगी येथील ग्रामस्थ काळूराम पारधी यांनी संस्थेने तुंगी गावात राबवीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती देऊन असेच लोक उपयोगी कार्य निरंतर सुरु असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल रूपनवर यांनी उपस्थितांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. सहाय्यक कृषी अधिकारी नितीन भानवसे यांनी सदर महिला बचत गटांना कृषीविभागद्वारे मार्गदर्शन करून कलम बांधणी पासून ते मार्केटिंग तसेच शासकीय लायसन्स मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून देणार असल्याची हमी दिली.रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपाडा येथील शिक्षिका स्वाती अवरगंडे यांनी संस्थेने शाळेसाठी केलेल्या विविध उपक्रम जसेकी रंगरंगोटी, पाणी फिल्टर, सौर प्रकल्प उपक्रमाचे कौतुक करून केले.
Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल

Web Title: Karjat news launch of a new kitchen garden initiative distribution of sprayers and vermicompost to farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
1

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
2

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
3

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.