Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट प्रकल्पाला परवानग्या मिळत असताना खासदार काय करीत होते? ॲड. ऋषिकेश जोशी यांचा सवाल

Karjat News : टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सह्याद्रीतील जंगलतोडीचा मुद्दा तापला आहे. या प्रकल्पाला परवानग्या मिळत असताना महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत आवाज का उठवला नाही, असा सवाल ॲड. ऋषिकेश जोशी यांनी उपस्थित केला. विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 13, 2026 | 08:42 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • खासदारांनी संसदेत आवाज का उठवला नाही?
  • जंगलतोडीच्या धोरणावर विरोधकही शांत
  • खासदारांना थेट प्रश्न विचारा : ॲड. जोशी
Karjat News : सह्याद्री पर्वतरांगांमध्ये टोरंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. या प्रकल्पाला विरोध करत भाजप पदाचा राजीनामा देणारे ॲड. ऋषिकेश जोशी यांनी आता थेट महाराष्ट्रातील खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वन विभाग दोन गुंठे जमिनीच्या परवानगीसाठी चार-चार वर्षे लावतो; मग ६४० एकर जंगलाची जमीन देताना खासदार गप्प का होते, असा सवाल त्यांनी केला.

खासदारांनी संसदेत आवाज का उठवला नाही?

देशातील पहिला पंप स्टोरेज प्रकल्प सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभा राहत असताना नवी दिल्लीत त्यासंदर्भातील परवानग्या दिल्या जात होत्या. त्यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी या निर्णयाला विरोध का केला नाही, असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने सुधारित वन अधिनियम आणल्यानंतर पूर्वी राखीव असलेल्या जंगलांमध्येही उद्योग उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. या कायद्यामुळे देशातील एकूण जंगलक्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के जंगल धोक्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Mumbai Youth Festival : मुंबईत 25 नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव; युवक-युवतींना कलागुण दाखवण्याची संधी

जंगलतोडीच्या धोरणावर विरोधकही शांत

टोरंट प्रकल्पाच्या विरोधात सोशल मीडियामुळे जनमत तयार झाले; अन्यथा अनेक राजकीय पक्ष या विषयावर निद्रिस्त राहिले असते, अशी टीका जोशी यांनी केली. काँग्रेस, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते कर्जत येथे प्रकल्पविरोधी भूमिकेसाठी आले होते.

मात्र, वन संरक्षणाशी संबंधित कायद्यांवर संसदेत चर्चा सुरू असताना या पक्षांच्या खासदारांनी नेमकी काय भूमिका घेतली, याचे उत्तर मिळायला हवे, असे ते म्हणाले. जंगलतोडीला कारणीभूत ठरणाऱ्या कायद्यातील तरतुदी आणि कॉर्पोरेट कंपन्यांना मिळणाऱ्या सवलतींविरोधात विरोधकांनीही आवाज उठवला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स

खासदारांना थेट प्रश्न विचारा : ॲड. जोशी

वन विभागाच्या परवानग्या, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा मुद्दाही जोशी यांनी उपस्थित केला. संसदेतील कायदे आणि न्यायालयाच्या आदेशांमधील संभाव्य विसंगती तपासून त्याविरोधात न्यायालयात जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. टोरंट प्रकल्पाविरोधात आम्ही आमच्या ताकदीने न्यायालयीन लढा देऊ; मात्र नागरिकांनी आपल्या मतदारसंघातील खासदारांना वन कायद्याबाबत त्यांनी काय केले, असा जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.

जंगल नष्ट होत असताना लोकप्रतिनिधी शांत का राहिले, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. जंगलातील दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी आणि जैवविविधतेचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी केवळ सत्ताधाऱ्यांचीच नव्हे, तर मौन बाळगणाऱ्या विरोधकांचीही असेल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Karjat news torrent project permission mp rishikesh joshi question cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Forest Department
  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nandurbar News : ‘काळजी करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’; मंत्री आदिती तटकरे यांची बालिकाश्रमातील मुलींना ग्वाही
1

Nandurbar News : ‘काळजी करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’; मंत्री आदिती तटकरे यांची बालिकाश्रमातील मुलींना ग्वाही

World News : इराणच्या अणुप्रकल्पाबाबत चिंता वाढली; इस्फाहानमधील भूमिगत केंद्राची पाहणी करण्यास इराणचा नकार
2

World News : इराणच्या अणुप्रकल्पाबाबत चिंता वाढली; इस्फाहानमधील भूमिगत केंद्राची पाहणी करण्यास इराणचा नकार

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला
3

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत
4

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.