कर्जत तालुक्यात महावितरणकडून वीज ग्राहकांची फसवणूक? ग्राहकांना न विचारता बसवले स्मार्ट मीटर
महावितरणकडून कर्जत तालुक्यात ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने यास तीव्र विरोध होत असून, तरीदेखील महावितरणकडून नेमलेले ठेकेदार जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे.
नेरळ परिसरात महावितरणच्या अधिकृत ठेकेदारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू केले आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेत लोक घरी नसताना जुने मीटर काढून नव्या स्मार्ट मीटरची जोडणी करण्यात आली. त्यामुळे संतप्त ग्राहक थेट महावितरणच्या कर्जत येथील कार्यालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला की, “कुणाची परवानगी घेतली? आमच्याशी काही संवाद न साधता आमच्या घरी स्मार्ट मीटर का लावले?”
“आम्ही लोककल्याणाचा मार्ग निवडला आणि त्यांनी…” एकनाथ शिंदेनी लगावला उबाठाला टोला
ग्राहकांनी आरोप केला की, ठेकेदारांनी त्यांच्या मीटरची जबरदस्तीने अदलाबदल करून तीव्र अनागोंदी निर्माण केली आहे. “आमच्या मीटरची चोरी झाली असून, आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही,” असा थेट आरोपही काही ग्राहकांनी केला.
याबद्दल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टर ने लावले असे सांगितले आहे. त्यांना तसे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून त्यांना विचारणा करावी लागेल असे उत्तर दिले. त्यात परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई व्हावी यासाठी ग्राहकांनी मागणी केली असून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Thane News : ठाणेकरांसाठी पर्वणी! शहरात पावसाळी रानभाजी महोत्सवाचं आयोजन
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्राहकांनी मागणी केली आहे की, “स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवर बंदी घालावी. या मीटरमुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. मीटरमधून चुकीचे बिल येण्याची भीती असून यामुळे सर्वसामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत येऊ शकतो.”
या प्रकारामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील विश्वासाचं नातं ढासळत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.