
कर्जत /संतोष पेरणे : तालुक्यात हजारो वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे, दरम्यान कर्जत तालुक्यात पाच धरणे बांधली जात असून असून कर्जत तालुका भविष्यात भूकंप प्रवण तालुका बनणार आहे.
कर्जत तालुक्याच्या दक्षिण दिशेला उल्हास नदीवर कोंढाणे धरण सिडको कडून बांधले जात आहे. तर पूर्व भागात पोटल पाली आणि कोतवाल खलाटी भागात टोरंट तर भिवपुरी भागात पेज नदीवर टाटा आणि बोरगाव येथील पोश्री नदीवर पोशीर धरण आणि चिल्हार नदीवर शिलार येथे शिलार धरण होणार आहे. ही पाचही धरणे तालुक्याच्या दोन दिशेला बांधली जाणार आहेत. या पाचही धरणामुळे कर्जत तालुक्यातील नद्या पावसाळ्यात देखील कोरड्या राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यपेक्षा भयावह स्थिती या धरणामुळे कर्जत तालुक्यात दररोज अनुभवास मिळणार आहे.
धरणे बांधली जात असताना अब्जवधी लिटर पाण्याचा साठा होणार आहे. त्या पाण्याच्या साठ्यामुळे कर्जत तालुक्याला दररोज भूखांपाचे हिरडे बसण्यास सुरुवात होणार आहे.भूखांपाचे हादरे हे पर्यावरणाचा ढासळलेले समतोल हे त्यास कारण असणार आहे. कर्जत तालुक्यात गरज नसताना पाच धरणे बांधली जाणार असल्याने भूखपाच्या छायेत कर्जत तालुका येणार आहे.
ही धरणे बांधली जात असताना त्याचा तेथील जमिनीवर परिणाम होणार आहे. प्रकल्पासाठी शेतकरी जमीन घेतली जाईल आणि शेती क्षेत्र कमी होणार आहे आणि आपोआप पिकांची उत्पादकता कमी होईल आणि स्थानिक अन्ननिर्मितीवर परिणाम होईल. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातील.
झाडतोडीमुळे जंगलातील प्राणी, पक्षी व कीटकांचे अधिवास नष्ट होतील.जैवविविधता कमी होईल; काही प्रजातींचे लुप्त होण्याचा धोका.मोठ्या प्रमाणात फॉरेस्टची जमिन संपादन होणार आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागेल, त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करू शकतात.पावसाचे पाणी अडवल्याने हे पाणी नद्या, ओढे आणि तलावात मिसळल्यास जलचर प्राणी आणि मासे प्रभावित होतील.
भूजल स्तर कमी होईल, पाणी साठवण्याची क्षमता कमी होईल. प्रकल्पातील मशीन व वाहतूकामुळे धूळ, कार्बन डायऑक्साईड व इतर प्रदूषक वायू हवेत मिसळतील.स्थानिक लोकांमध्ये श्वसनाचे आजार, दम आणि त्वचेचे आजार वाढू शकतात. प्रदूषित हवा झाडे व पिकांवरही परिणाम करेल.हवामान व नैसर्गिक पर्यावरण तसेच प्रकल्पामुळे स्थानिक तापमान वाढू शकते आणि पावसाचे पॅटर्न बदलू शकतात; काही काळ कोरडेपणा किंवा पूर येण्याची शक्यता आणि नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडेल.
प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार असिवून झाडतोडीमुळे होणारे अप्रत्यक्ष परिणाम दिसून येणार असून झाडे हटल्यामुळे हवामान उष्ण होणे; परिसरात उष्णता वाढेल.मातीची ओलसरता कमी होईल → पावसाळ्यात भूस्खलन व मातीची धूप होईल. पक्षी व कीटक कमी होऊन परागीकरण आणि फळ उत्पादनावर परिणाम होईल.मानवी आरोग्यावर परिणाम तसेच हवा व पाणी प्रदूषणामुळे श्वसन, हृदय, त्वचा व पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.त्यामुले कर्जत तालुक्याचा ऱ्हास करणारी प्रकल्प सरकारने रद्द करावेत यासाठी मोठे आंदोलन कर्जत तालुक्यात उभे राहण्याची शक्यता निर्मण झाली आहे.
Ans: कर्जत तालुक्यात टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सुरू असून यासोबतच पाच धरणे प्रस्तावित/बांधकामाधीन आहेत. यात उल्हास नदीवरील कोंढाणे धरण (सिडको), पोटल पाली व कोतवाल खलाटी भागातील टोरंट प्रकल्प, भिवपुरी येथे पेज नदीवरील टाटा प्रकल्प, बोरगाव येथील पोश्री नदीवरील पोशीर धरण आणि चिल्हार नदीवरील शिलार धरण यांचा समावेश आहे.
Ans: प्रकल्पासाठी हजारो हेक्टर वनजमिनीचा वापर होणार असून मोठ्या प्रमाणावर झाडतोड केली जाणार आहे. यामुळे जंगलांचा ऱ्हास, जैवविविधतेचा नाआणि नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Ans: मोठ्या धरणांमुळे अब्जावधी लिटर पाण्याचा साठा निर्माण होतो. या पाण्याच्या दाबामुळे भूगर्भातील ताण वाढून “रिझर्व्हॉयर इंड्यूस्ड सिस्मिकिटी” म्हणजेच कृत्रिम भूकंपाची शक्यता निर्माण होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात वारंवार भूकंपाचे सौम्य हादरे जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.